मुंबई : मकर संक्रांतीनिमित्त (Makar Sankranti) सोमवारी राज्यभरात दिवसभर पतंगबाजी पाहायला मिळाली. मात्र, यावेळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा देखील वापर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे, यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhaji Nagar) नागपूर (Nagpur) जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 90 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यात लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. तर, चंद्रपुरात पतंग पकडतांना एकाच मृत्यू झाला आहे. 


छत्रपती सभाजीनगरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंगबाजी दरवर्षी केली जाते. यंदाही अशीच काही पतंगबाजी पाहायला मिळाली. मात्र, शहरात यंदाही बंदी असलेला नायलॉन मांजाचा वापर झाला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पतंगबाजीमध्ये 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यात 9 महिन्याच्या मुलीचाही समावेश आहेत. विशेष म्हणजे 4 जण गंभीर जखमी असून, 20 पक्षीही मांज्यात अडकून जखमी झाले आहेत. सोबतच, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 19 जणांवर  कारवाई करण्यात आली आहे. सोबतच, वैजापूरमध्ये कारवाई केल्याने अधिकारी तरुणांमध्ये वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 


मकर संक्रांतीनिमित्त सोमवारी नागपुरात दिवसभर पतंगबाजी सुरू होती, दरम्यान नायलॉन मांजामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. नागपुरात वेगवेगळ्या घटनांमध्ये 40 वर जखमी झाले. यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती. ज्यात, रिंग रोडवरून 54 वर्षीय दुचाकीस्वार जात असताना अचानक मांजा समोर आला, त्यांचा गळा कापला गेला. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. भानखेडा येथे देखील अशीच काही घटना समोर आली आहे. एका 28 वर्षीय युवक नायलॉन मांजामुळे जखमी झाला आहे. त्याला दहा टाके लागले आहेत.


चंद्रपुरात 'पतंग'बाजी बेतली जीवावर... 


चंद्रपुरात 'पतंग'बाजी जीवावर बेतली आहे. पतंग पकडताना स्लॅबवरून खाली पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आनंद वासाडे ( वय 49 असे)  असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी स्लॅबवरून तोल गेल्याने आनंद यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भानापेठ परिसरात राहणारे आनंद वासाडे हे घराच्या स्लॅबवर गेले होते. याचवेळी एक पतंग कटलेली त्यांना दिसली. ही पतंग पकडण्यासाठी आनंद वासाडे गेले, मात्र, स्लॅबवरून तोल गेल्याने ते खाली पडले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Makar Sankranti 2024 : यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका, 'हा' रंग घालणं शुभ