छत्रपती संभाजीनगर :  लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election)  अनुषंगाने सध्या पैसा आणि अवैध मद्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. यापूर्वी ईडी (ED), सीबीआयच्या धाडीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली जात होती. मात्र, निवडणूक काळात पोलिसांच्या (Police) नाकाबंदी आणि प्रचार यंत्रणेदरम्यान होत असलेल्या तपासातही रोकड आढळून येत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी मतदारांना (Voter) वाटण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरण्यात येत असलेली अवैध रोकड जप्त करण्यात आली आहे. आता, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील पैठण गेट परिसरात  मतदानाच्या एक दिवस आधी पोलिसांना सुमारे 39 लाख 65 हजारांची रक्कम जप्त केलीये.


छत्रपती संभाजीनगर येथील पैठण गेट परिसरात  मतदानाच्या एक दिवस आधी पोलिसांना सुमारे 39 लाख 65 हजारांची रक्कम जप्त केलीये. पैठण गेट परिसरातील एका मोबाईलच्या दुकानातून ही रक्कम जप्त करण्यात आलीये. शिवाय सोबत पैसे मोजण्याची मशीन देखील आढळून आली आहे. या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी ही रक्कम ठेवण्यात आली होती. तसंच दुकानदाराकडून या रकमेबाबत समाधानकारक उत्तर मिळाली नसल्यानं  ही रक्कम जप्त करण्यात आली. तसंच याप्रकरणी आता पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीये. 


मोबाईल अॅक्ससेसरीच्या दुकानातून  रक्कम जप्त


 पैठण गेट परिसरातील मोबाईल अॅक्ससेसरीच्या दुकानातून ही रक्कम जप्त करण्यात आली. शिवाय सोबत पैसे मोजण्याची मशीन देखील आढळून आली आहे. या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी ही रक्कम ठेवण्यात आली होती. दुकान चालकाकडून या रकमेबाबत समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली.याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा पैसा कुठून नेला जात होता, याची चौकशी केली जात आहे. या रकमेचा निवडणुकीची काही संबंध आहे का यासंदर्भात देखील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.


दुकानावर दहा दिवस पाळत


निवडणूक काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहे. आम्हाला आमच्या खबऱ्यांकडून दहा दिवसापूर्वी या संदर्भात माहिती मिळाली होती.  आम्ही दुकानावर दहा दिवस पाळत ठेवून होतो, असे पोलीस म्हणाले.   निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. मतदारांना भुलवण्यासाठी याचा वापर केला जातो. ते रोखण्यासाठी  निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारले जातात आणि संशयित वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली जाते. रस्ते वाहतुकीमार्फत होणारी पैशांची ने-आण रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरवेळी निवडणुकीत हे प्रकार समोर येत असतात.  


हे ही वाचा :


टिप्परने धडक दिली, छोटा हत्तीमधून नोटांचे बंडल रस्त्यावर पडले; पोलिसांनी जप्त केले 7 कोटी रुपये