Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडीओ पाहून पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत दुसऱ्याच महिलेसोबत कोर्टात लग्न करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींवर मुकुंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने पोलिसात धाव घेत दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे लग्न 2018 साली झाले होते. यानंतर तिच्या पतीने तिला काही दिवस चांगले वागवले. मात्र त्यानंतर किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. मोबाईलमध्ये असलेल्या अश्लील व्हिडिओ प्रमाणे अनैसर्गिक शरीर संबंध करीत त्रास दिला. त्यानंतर काही दिवसांनंतर त्याने दुसऱ्या एका महिलेसोबत कोर्टात दुसरे लग्न केले. याच काळात तक्रारदार महिलेच्या  सासू-सासर्‍यांनी माहेरून शाळा सुरू करण्यासाठी चार लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला नांदवणार नाही अशी तिला धमकी दिली. रात्रीच्या वेळी उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे या सततच्या त्रासाला कंटाळून तिने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे पुढील तपास करीत आहेत.


अत्याचार करणाऱ्याला 14 वर्षे सक्तमजुरीची 


दुसऱ्या एका घटनेत अत्याचार करणाऱ्याला 14 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. विवाहिता आणि तिच्या मुलाचे अपहरण करून मुलासमोरच विवाहितेला मारहाण करीत अत्याचार करणारा आरोपी चरण प्रेमसिंग सुलावणे (25, रा. सुलिभंजन, ता. खुलताबाद) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी 14 वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली 21 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीला ठोठावलेल्या दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून पीडितेला देण्याचे, तसेच विधी व न्याय विभागानेदेखील योग्य तो मोबदला पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 


या प्रकरणात पीडित विवाहितेने फिर्याद दिली होती की, आरोपी हा शाळेपासून पीडितेच्या ओळखीचा होता. तो पीडितेवर एकतर्फी प्रेम करत होता, मात्र पीडितेचे लग्न दुसऱ्याशी झाले. तिला दोन मुले असून, घटना घडण्याच्या सुमारे दीड वर्षापासून पीडितेचा पती मोक्काच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. दरम्यान आरोपीने महिलेला मारहाण करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता. प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी 11 साक्षीदारांचे जवाब नोंदवले. त्यात पीडितेसह वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी चरण सुलावणे याला दोषी ठरवून वरील शिक्षा ठोठावली.


इतर महत्वाच्या बातम्या:


Chhatrapati Sambhaji Nagar : जमिनीच्या वादातून मुलानेच केली सावत्र आईची हत्या, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना