Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेबावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनी आधी स्वत:चचे चारित्र्य बघावे. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात कामाला होतात की नाही, तिकडे नोकऱ्या करायचात की नाही, हे सांगावे. आम्ही तर दरबारात साधे चोपदारही नव्हतो. त्यामुळे लोकांना शहाणपणा शिकवताना प्रथम आपला इतिहास तपासावा, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना फटकारले.


वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात राज्यात औरंगजेबाच्या फोटोवरुन राज्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्यातच  प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन भाजपने शिवसेनेवर निशाणाही साधलाय. कारण प्रकाश आंबेडकर हे सध्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर आहेत. आता यावर काय प्रतिक्रिया उमटते ते पाहावं लागेल..


आम्ही जे शिबीर घेतलं आहे महाराष्ट्रभरातून सर्व कार्यकर्ते इथे आलेले आहेत. एकाच ठिकाणी आम्ही सोय करू शकत नव्हतो, ट्रस्टीशी बोललो होतो काही जणांची या ठिकाणी राहण्याची सोय करा, असं आम्ही म्हटलं.  त्यांनी ते मान्य केलं म्हणून ट्रस्टीला भेट देण्यासाठी आज आलो होतो. भद्रा मारुती मंदिराचे नवीन बांधकाम बघत मंदिराला भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे. 



तुम्ही जयचंद आहात का? याचा खुलासा करा -
लोकांची श्रद्धा आहे, आपली श्रद्धा आहे की नाही हा वेगळा भाग.  लोकांच्या श्रद्धेचा मान राखला पाहिजे. कोविडच्या काळात मंदिराच्या संदर्भातला आंदोलन आम्हीच उभी केलं होतं. ज्यांनी वाद निर्माण केलाय त्यांनी स्वतःच चरित्र पाहावं. औरंगजेबाच्या दरबारामध्ये कामाला होते का नाही ते सांगावं. नोकऱ्या करत होते का नाही ते सांगावं. आम्ही तर दरबाराचे चोपदारही नव्हतो. लोकांना शहाणपण शिकवताना आपला इतिहास पहावा. एवढेच बाबासाहेबांनी या सगळ्यांना उद्देशून म्हटलं होतं. जुन्या राजवटीच्या काळामध्ये जयचंद निर्माण झाले. जयचंदनी परदेशी लोकांना राज्यात आणलं. पहिल्यांदा तुम्ही जयचंद आहात का? याचा खुलासा करा आणि नंतर बोला, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


बारा ठिकाणी दंगलीचा प्रयत्न -
बारा ठिकाणी दंगली करण्याचा प्रयत्न झाला. नागपूरचा एसआयटीचा रिपोर्ट आपण वाचला, तर गव्हर्मेंटला त्यांनी अलर्ट केलं होतं. काही संघटना दंगल करणार आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेने कुठेही दंगलीला प्रतिसाद दिला नाही. याचाच अर्थ असा आहे की, डिव्हाइड करायचा यांचा जो अर्थ आहे त्याला महाराष्ट्राच्या जनतेचा पाठिंबा नाही.  


शिवसेनेबाबत काय म्हणाले ?
उलट सेनेचे कार्यकर्ते यांनी आमच्या कार्यकर्तेकडे वक्तव्य केलं नाही. अजून सेनेच्या कार्यकर्त्यांनी वक्तव्य केलं नाही. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व त्यांच्या आजोबांचे हिंदुत्व आहे. आम्ही पहिल्या कार्यक्रमाला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस प्रबोधनकाराचे हिंदुत्व हे बाळ ठाकरे यांचे हिंदुत्व आहे. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेसाठी जे जे करता येईल तेथे केलं. मूळ गाभा सेनेचा आम्ही मानतो, प्रबोधनाच हिंदुत्व होतं. तेच हिंदुत्व आता असणारे शिवसेना घेऊन चालते आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


भाजपची प्रतिक्रिया -
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती अनेक वेळेला जाहीर करण्यात आली आहे.. युती झाली की नाही हे माहीत नाही.. मात्र दोघे सोबत आहेत, हे वारंवार दिसून येते. उद्धव ठाकरे यांनी हे आता स्पष्ट करावे की त्यांना प्रकाश आंबेडकर यांचे औरंगजेब यांच्या कबरीवर जाणे मान्य आहे का?  आजच उद्धव ठाकरे यांनी या घटनेबद्दल स्पष्ट करावे, असे बानवकुळे म्हणाले.