Aurangabad News : जगप्रसिद्ध आणि ‘दख्खन का ताज’ अशी ओळख असलेल्या ‘बीबी का मकबरा’ (Bibi Ka Maqbara) सारखा ऐतिहासिक वारसा आता धोक्यात आला आहे. कारण मकबराच्या भीती आणि मिनारावर अक्षरशः भेगा पडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी झाडीझुडपी उगवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मिनी ताजमहाल (Mini Taj Mahal) म्हणून ओळखल्या जाणारा मकबरा कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, लाखो रुपये मकबऱ्यावर खर्च करूनही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिनी ताज आणि जगप्रसिद्ध बीबी का मकबरा पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे देशातील ऐतिहासिक स्थळांपैकी एक असलेल्या मकबरा पाहण्यासाठी नेहमीच गर्दी असते. तर या मकबऱ्याच्या संवर्धनाची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे देण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून मकबऱ्याची पडझड पाहायला मिळत आहे. मकबऱ्याच्या भिंती आणि मिनार यावर भेगा पडत आहेत. अनेक ठिकाणी झाडीझुडपी उगवत आहे. त्यामुळे बीबी का मकबरा सारखा ऐतिहासिक वारसा आता धोक्यात आला असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. तर पावसाळ्यात अशाप्रकारे झाडे उगवणे हे एक नैसर्गिक प्रक्रिया असून, पाऊस कमी झाल्यावर तात्काळ आम्ही ती झाडे नष्ट करतो. तसेच भेगा देखील भरण्याचे काम नेहमी सुरू असते असे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
काय आहे प्रकार?
‘दख्खन का ताज’ अशी ओळख असलेल्या जगप्रसिद्ध ‘बीबी का मकबरा’च्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, त्यानंतरही हा ऐतिहासिक वारसा धोक्यात आल्याचा आरोप केला जात आहे. कारण, आज घडीला मकबऱ्याच्या अनेक ठिकाणी झाडीझुडपी वाढली असून, बहुतांश ठिकाणी भेगा देखील पडल्या आहेत. त्यामुळे मकबरा कमकुवत होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, पावसाळ्यात अशाप्रकारे झाडे उगवणे हे एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
गेल्यावर्षी मकबराच्या मिनारचा कोपरा कोसळला होता...
विशेष म्हणजे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात देखील औरंगाबादचे वैभव असलेला ऐतिहासिक ठेवा म्हणजे बीबी का मकबराच्या मिनारचा एक कोपरा कोसळला होता. त्यावेळी देखील मकबराच्या संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा अनेक ठिकाणी भेगा पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: