Aurangabad News : औरंगाबादच्या (Aurangabad) सोयगाव तालुक्यातील एका गावात विचित्र प्रकार समोर आला आहे. तीन मुलांच्या आईला गावातील एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान माझ्या पत्नीचं अपहरण करण्यात आला आहे. तसेच अपहरण करणाऱ्या तरुणाचा आणि त्याच्या कुटुंबातील लोकांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी बेपत्ता झालेल्या महिलेच्या पतीने केली आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी या तरुणाने थेट गाव बंदची हाक दिली आहे. तर त्याच्या या हाकेला गावातील अनेकांनी पाठिंबा देखील दिला आहे. 


सोयगाव तालुक्यातील एका गावातील युवकाने 11 जुलै रोजी आपल्याच गावातील एका विवाहित आणि तीन मुलांची आई असलेल्या महिलेला घेऊन पळून गेला. महिलेच्या पतीने गावात आणि नातेवाईकांकडे पत्नीचा शोध घेतला. मात्र ती कोठेही आढळून आली नाही. त्यामुळे शेवटी हतबल झालेल्या पतीने पोलिसात पत्नी बेपत्ता झाली असल्याची तक्रार दिली. तर आपल्या पत्नीला फूस लावून पळवून नेण्यात आले असून, तिचं धर्मांतर करण्याची शक्यता असल्याचा आरोप तक्रारदार पतीने केला आहे. तर त्याच्या याच मागणीला गावकऱ्यांनी देखील पाठींबा दिला आहे. तर आरोपींचा शोध घ्या अन्यथा उद्या (17 जुलै) रोजी गावकऱ्यांनी गाव बंदची हाक दिली आहे. 


बेपत्ता असलेलीं विवाहित महिला आपल्या पतीसोबत गावात राहत होती. पतीला शेतात मदत म्हणून ती शेती करायची. या महिलेला तीन अपत्य आहे. मात्र 11 जुलै रोजी आपल्याच गावातील एका तरुणासोबत ती निघून गेल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. विशेष म्हणजे पळवून नेणारा तरुण महिलेपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. तर तरूणासोबतच त्याच्या कुटुंबातील सदस्य देखील गावातून घर सोडून कोठेतरी निघून गेल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे माझ्या पत्नीचं शोध घ्या अन्यथा तिचा घातपात होण्याची शक्यता तक्रारदार पतीने वर्तवली आहे. 


उद्या गाव बंदची हाक...


या प्रकरणात 12 तारखेला पोलिसांत मिसिंग तक्रार दिली होती. त्यानंतर आणखी दोन दिवसांनी म्हणजेच 15 जुलैला पतीने पुन्हा पोलिसांत तक्रार देत, आपल्या पत्नीला फूस लावून तिचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार दिली. तसेच माझ्या पत्नीचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा, अन्यथा 17 जुलैला गाव बंदची हाक या तरुणाने दिली आहे. तर त्याच्या हाकेला गावकऱ्यांनी सुद्धा पाठींबा दिला आहे. तसेच त्यानंतर देखील सुद्धा शोध लागला नाही तर गावातील तरुण, युवक व ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही बेपत्ता महिलेच्या हफपती, नातेवाईक व ग्रामस्थानी दिलेला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


डबल धमाका स्कीम! दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने मुद्दलही लुटली; 22 जणांना लाखोंचा गंडा