Aurangabad Crime News : मागील काही दिवसांत औरंगाबाद (Aurangabad) शहरातील गुन्हेगारी सतत वाढतांना पाहायला मिळत आहे. पोलिसांचा धाकच उरला नसल्याने या गुन्हेगारांमधील भीती संपल्याचा आरोप होत आहे. शहरात अवैध धंधे वाढले असल्याचा आरोप होत असतांना आता चोरीच्या घटना देखील घडतांना पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य मार्केटपैकी एक असलेल्या कॅनॉट परिसरात अशीच एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. चोरांनी या भागातील एक मोबाईल शॉपीत चोरी करत तब्बल 3 लाखांचे मोबाईल फोनसह इतर साहित्य चोरून नेले आहेत. शहरातील एका महत्वाच्या मार्केटमध्ये ही चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चोरी करणारे दोघे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 


मागील काही दिवसांपासून औरंगाबादकर मोटरसायकल चोरीमुळे त्रस्त आहेत. त्यातच आता रात्रीच्या चोरीच्या घटनांमुळे अधिकच चिंता वाढली आहे. औरंगाबाद शहरातील मुख्य मार्केट असलेल्या कॅनॉट भागात रात्री तीन वाजता एका दुकानाचे शटर ऊचकाऊन चोरी करण्यात आली आहे. रेणुका टेलिकॉम असे या मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानाचे नाव आहे. चोरांनी या दुकानातून तब्बल 3 लाख रुपयांचे मोबाईल, स्मार्ट वॉच, एअर बड् आणि रोख रक्कम लंपास केली आहे. यात चोरी करणारे दोन जण दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 


व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण... 


काही दिवसांपूर्वी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधी मार्केटमध्ये नशेखोरांकडून विनाकारण व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या मारहाणीच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेने बंद पाळला होता. आता चोरीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. वाढत्या गुन्हेगारीचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे पोलिसांनी यावर मार्गे काढण्याची मागणी होत आहे. तर रात्रीची पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी देखील केली जात आहे. 


पोलीस चौकी करण्याची मागणी... 


औरंगाबादच्या सिडको भागातील कॅनॉट परिसर महत्वाचे मार्केट समजले जाते. या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. तर छोट्या-मोठ्या वादाच्या घटना या परिसरात नेहमीच घडतात. काही तरुणांच्या टोळक्या सतत या भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यातच आता चोरीच्या घटना समोर येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर मागील अनेक वर्षांपासून या भागात पोलीस चौकी उभारण्याची मागणी होत आहे. त्यामुळे मागील काही घटना पाहता पुन्हा एकदा ही मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


'पिस्तुल्याभाई'ला पोलिसांनी शिकवला धडा; हातात शस्त्र असलेल्या फोटोंची केली होती बॅनरबाजी