Market Committee Election : ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या राज्यातील बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. दरम्यान छत्रपती संभाजीनगर बाजार समिती, वैजापूर आणि कन्नड या तीन बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान झाले असून, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महावीकास आघाडीने खाते उघडले आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीची आगेकूच पाहायला मिळत आहे. कारण या ठिकाणी महावीकास आघाडीचे तीन उमेदवार आतापर्यंत विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत सर्वसाधरण मधून कैलास उकिरडे, अनुसूचित जाती गटातून महेंद्र खोतकर विजय झाले आहेत.
मोठी बातमी! बाजार समिती निवडणुकीत संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीने खाते उघडले
रवी मुंडे, एबीपी माझा | Edited By: मोसीन शेख Updated at: 29 Apr 2023 11:16 AM (IST)
Market Committee Election : आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे.
मोठी बातमी! बाजार समिती निवडणुकीत संभाजीनगरमध्ये महावीकास आघाडीने खाते उघडले