मोठी बातमी! अमित शाहांचा औरंगाबाद दौरा रद्द, वेळेचं नियोजन होत नसल्याने घेतला निर्णय

Amit Shah : अमित शाहांच्या दौऱ्याची भाजपकडून आणि प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती.

Continues below advertisement

औरंगाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) 17 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येणार होते. याबाबत अमित शाहांचा औरंगाबाद दौरा देखील आला होता. मात्र शाहांचा हा औरंगाबाद दौरा आता रद्द झाला आहे. 17 सप्टेंबर रोजी अमित शाह यांचे वेळेचे नियोजन होत नसल्याने, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमित शाहांच्या दौऱ्याची भाजपकडून आणि प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. मात्र, आता हा दौरा रद्द झाला आहे.

Continues below advertisement

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांचे दौर वाढले आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील नेत्यांचे देखील राज्यात होणारे दौरा वाढतांना पाहायला मिळत आहे. अशातच गृहमंत्री अमित शाह यांचा 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौरा ठरला होता. स्थानिक भाजप नेत्यांकडून याबाबत माध्यमांना माहिती देखील देण्यात आली होती. सोबतच अमित शाह यांचा संपूर्ण दौरा देखील आला होता. या दौऱ्यात ते मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. तसेच शाह यांच्या सभेची देखील भाजपकडून तयारी करण्यात आली होती. मात्र, आता हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर येत असून, भाजपकडून नेत्यांकडून देखील याला दुजोरा देण्यात आला आहे. 

यामुळे झाला दौरा रद्द...

अमित शाह यांचा दौरा रद्द झाल्याबाबत भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे. 17 सप्टेंबरला अमित शाह हे बिहार दौऱ्यावर असणार आहे. सकाळचे सर्व कार्यक्रम त्यांचे बिहारमध्ये होणार असून, सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर ते औरंगाबादचा दौरा करून, पुढे तेलंगणाला जाणार होते. मात्र, एका दिवसांत तीन राज्याच्या दौरा करतांना वेळेचं नियोजन होत नसल्याने त्यांनी औरंगाबाद दौरा रद्द केला असल्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिली आहे. 

भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली होती... 

मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह येणार होते. त्यांच्या प्रमुख उपस्तितीत एमआयडीसी चिकलठाणा भागात भव्य सभा होणार होती. त्यांचा दौरा गृह मंत्रालयाने जाहीर केला होता. ज्यात 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता बिहारमधील दरभंगा विमानतळावरून विशेष विमानाने संध्याकाळी औरंगाबाद विमानतळावर उतरणार होते. त्यानंतर मोटारीने एमआयडीसी चिकलठाणा भागातील सभेच्या ठिकाणी दाखल होणार होते. संध्याकाळी 5 ते 6.30 या दरम्यान ही सभा होणार होती. त्यानंतर ते विमानतळावरून विशेष विमानाने हैदराबादकडे रवाना होणार होते. सभेसाठी भाजपसह प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, आता दौराच रद्द झाला आहे.

संबंधित बातम्या: 

Amit Shah: अमित शहा 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी; सभेचंही नियोजन?

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola