Ambadad Danve on Sandipan Bhumre: शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी (Sandipan Bhumre criticism) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray news) यांच्यावर आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर अंबादास दानवे यांनी अत्यंत खोचक शब्दात संदीपान भुमरे यांना चिमटे काढले आहेत. ध्यानीमनी नसताना आपल्याला कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देणारे उद्धव साहेब ठाकरे हेच होते, अशी आठवण करून देत त्यांच्या संसदरत्न पुरस्कारावरूनही संभाजीनगरचे शशी थरूर म्हणत बोचरी टीका केली आहे. 

Continues below advertisement

संभाजीनगरचे शशी थरूर म्हणून ओळखले जाणारे खासदार साहेब.. (Ambadad Danve on Sandipan Bhumre) 

अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की, सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे (Parliament Ratna Award Sandeepan Bhumre) यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन! संभाजीनगरचे शशी थरूर म्हणून ओळखले जाणारे खासदार साहेब यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न महिला, कामगार, रस्ते, आरोग्य आणि एकंदरीत गरीब-गरजू लोकांचे आवाज बनत सत्ताधाऱ्यांना आपल्या भाषणाने घाम फोडत आवाज नेहमीच उठवत संभाजीनगरच्या प्रत्येक प्रश्नला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हा पुरस्कार जिल्ह्याला शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आहे. संपूर्ण संसद आपल्या भाषणाने हलवून सोडणारे संदिपान भुमरे साहेब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा तर त्यांचा ज्ञानाचा आवाक्याबाहेरचा विषय नाही! 

स्लीपबॉय ते मद्यविक्रीसम्राट हा प्रवास सर्वश्रुत (Sambhajinagar politics)

अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे साहेबांवर टीका करताना संदीपान भुमरे यांनी हे ध्यानी घ्यावं की, ध्यानीमनी नसताना आपल्याला कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देणारे उद्धव साहेब ठाकरे हेच होते. कोविडचे बलशाली संकट राज्यावर असताना उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडून आपल्या रोजगार हमी खात्याचा रुपयाही निधी कपात करण्यात आला नव्हता. 2019 पर्यंत आपण जो निवडणूक उमेदवारी अर्ज भरून आमदार झालात, त्या फॉर्मवर उद्धव ठाकरे साहेबांचीच सही होती. आपले सुपुत्र जिल्हापरिषद सदस्य, सभापती झाले ते उद्धव साहेब ठाकरे यांच्याच पक्षाकडून झाले होते.आपला स्लीपबॉय ते मद्यविक्रीसम्राट हा प्रवास सर्वश्रुत आहे. कशाला अधिक बोलायला लावता? दानत आणि हिम्मत असेल तर सरकारला कर्जमुक्ती देण्यासाठी आपण भाग पाडाल! जे तुमच्या आवाक्याबाहेर आहे. 

Continues below advertisement

काय म्हणाले संदीपान भुमरे? (Sandipan Bhumre criticism)

अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे कधी आम्हाला भेटले नाही, ते कायम ऑफलाईन होते, ऑनलाईन भेटायचे. वर्षा बंगला आम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पाहिला. ठाकरे आम्हाला तिथे येऊ देत नव्हते, अशी टीका भुमरे यांनी केली होती. या टीकेनंतर दानवे यांनी अत्यंत खोचक शब्दात संदीपान भुमरे यांचा समाचार घेतला. 

इतर महत्वाच्या बातम्या