Sanjay Raut On  Abdul Sattar : आधीच वेगवगळ्या कारणांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) अडचणीत असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी सत्तार यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचे भूखंड सत्तार यांनी गिळल्याचे आरोप राऊत यांनी केले आहे. तर याबाबत त्यांनी ट्वीट करत फडणवीस यांना लक्ष घालण्याची मागणी देखील केली आहे. 


वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गटासोबत युती असल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाकडून टीका होत आहे. तर याच टीकेला आता संजय राऊत यांनी उत्तर दिले आहेत. याबाबत राऊत यांनी  ट्वीट करत म्हटले आहे की, “दे.भ. देवेंद्र जी हे खरे आहे? औरंगजेबाचा बंदोबस्त नंतर करू... आधी या औरंग्याच्या पेकाटात लाथ घाला. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची सुध्दा लूट सुरु आहे.”  सोबतच अब्दुल सत्तारांची या प्रकरणी सामनामध्ये छापून आलेल्या बातमीचे कात्रण आणि एक पत्र देखील राऊतांनी ट्वीट केले आहेत. 






काय आहे प्रकरण? 


सामनाने दिलेल्या वृत्तानुसार, सत्तार यांचे मतदारसंघ असलेल्या सिल्लोडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गट क्र. 92 मध्ये 2007 वर्षी नॅशनल एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यात आली होती. विशेष म्हणजे समीर अहमद नावाचा अब्दुल सत्तारांचा नातलग या सोसायटीचा कर्ताधर्ता असल्याचे बोलले जाते. तर या सोसायटीत एकूण 205 भूखंड आहेत. तर सर्व खरेदीदारांना रीतसर खरेदीखत करून सातबारावरही त्याची नोंद देखील घेण्यात आली होती. मात्र कालांतराने सत्तार यांना मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाली. त्यामुळे मेडिकल कॉलेजला जागा मिळवण्यासाठी अब्दुल सत्तार आणि त्यांच्या दोन मुलांनी सोसायटीतील प्लॉटधारकांना त्रास द्यायला सुरवात केली. ज्यात निल्लोड येथील अप्पाराव गिरजाराम गोरडे यांचा देखील 85 क्रमांकाचा 1300 चौरस फुटांचा प्लॉट आहे. तर गोरडे यांचा मुलगा योगेश लष्करात जवान असून त्याने हा प्लॉट विकत घेतला होता. सध्या ते राजस्थानात जोधपूर येथे कर्तव्यावर आहे. 


दरम्यान इतर प्लॉटप्रमाणे गोरडे यांचा देखील प्लॉट बळकावण्यासाठी सत्तार यांनी गोरडे कुटुंबावर प्रचंड दबाव आणला. गोरडे कुटुंबाची वेगवेगळ्या पद्धतीने कोंडी केली गेली. मात्र एवढ करून देखील गोरडे यांनी प्लॉटचे दानपत्र करून देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सत्तार यांच्या समर्थकांनी गोरडे यांच्या प्लॉटवर सर्व शासकीय यंत्रणांना हाताशी धरून बेकायदा कब्जा केला असल्याचं वृत्त सामनाने दिले आहे. 


सत्तार यांची प्रतिकिया... 


दरम्यान या सर्व आरोपांवर अब्दुल सत्तार यांनी प्रतिकिया दिली आहे. "माझ्यावरचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. हवं तर संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमावी. आरोप होत असलेला प्लॉट माझ्या हद्दीत नाही तर झोपडपट्टीच्या बाजूला आहे. मी 60 एककर जमीन हॉस्पिटलला दान दिली, त्यामुळे मी 1300 स्क्वेअर फुटचा प्लॉट कसा हडप करेल. त्यांनी त्यांची जमीन मोजावी आणि बांधकाम करावं. मी अल्पसंख्याक मंत्री असल्याने मला त्रास दिला जातोय. आत्तापर्यंत माझ्यावर 23 आरोप झाले, त्यात तथ्य आढळलं नाही. मी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवणार, असल्याचे सत्तार म्हणाले आहेत. 


 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Akola Raid: अकोला कथित धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषिमंत्री सत्तारांची सर्वांसमोर 'खरडपट्टी'; सत्तारांनी जोडले हात