Aurangabad ACB Action : औरंगाबाद (Aurangabad) लाचचुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB - Anti Corruption Bureau) केलेल्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी या पोलीस उपनिरीक्षकाने साक्षीदारांकडून एक लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर सापळा लावून जिन्सी ठाण्यातील या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. शहागंज भागात शुक्रवारी (14 जुलै) रोजी रात्री 9 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. अश्पाक मुश्ताक शेख असे लाच घेणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव असून, त्याने मे महिन्यात लाच मागितली होती. मात्र तेव्हापासून वेगवेगळी कारणे देत तो पैसे घेत नव्हता. मात्र शेवटी पथकाने शुक्रवारी त्याला सापळा लावून पैसे घेतांना रंगेहात पकडले आहे. 


लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात अटक


पोलीस उपनिरीक्षक अश्पाक शेख जिन्सी ठाण्यात कार्यरत होता. दोन महिन्यांपूर्वी दोन व्यावसायिक भागीदारांपैकी एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास उपनिरीक्षक अश्पाक शेख यांच्याकडे होता. या प्रकरणातील साक्षीदारांनाही आरोपी करण्याच्या धमक्या देत त्याने लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी एसीबी कार्यालय गाठत तक्रार दिली होती. त्यानंतर मे महिन्यातच एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली होती. तेव्हाच अश्पाक शेखने एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, तेव्हापासून तो वेगवेगळी कारणे देत तक्रारदार यांच्याकडून पैसे घेत नव्हता, प्रत्येकवेळी सापळा पुढे ढकलला जायचा. अखेर शुक्रवारी एसीबीच्या पथकाने त्याला लाच घेतांना रंगेहात पकडले.


आठ दिवसांपूर्वीच विशेष पथकात आला अन् अडकला...


अश्पाक शेख जिन्सी ठाण्यात कार्यरत होता. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी त्याला विशेष पथकात बढती देण्यात आली होती. मात्र विशेष कामगिरी सोडा त्याने विशेष लाचेचा कार्यक्रम राबवला आणि अडकला. त्यामुळे शुक्रवारी रात्री 9 वाजता एसीबीच्या पथकाने सापळा लावून कारवाई केली. दरम्यान, पोलीस दलात कारवाई होणार असल्याची सकाळपासूनच चर्चा होती. पण असे असतांना देखील अश्पाक शेखने लाच घेतली आणि अडकला. 


लाचखोर अश्पाक साक्षीदारांना द्यायचा अटकेची धमकी...


जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी दोन व्यावसायिकांमध्ये वाद झाला होता. यापैकी एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक अश्पाक शेख याच्याकडे देण्यात आला होता. अश्पाक हा साक्षीदारांनाही आरोपी करण्याच्या धमक्या देत होता. तसेच कारवाई आणि अटक टाळण्यासाठी त्याने एक लाखाची लाच मागितली होती. पण तक्रारदाराने लाचचुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेतल्याने त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


औरंगाबादेतील 'आदर्श घोटाळ्या'चा पहिला बळी; पतसंस्थेतील 22 लाख रुपये बुडण्याच्या धास्तीने आत्महत्या