छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात एका शासकीय ग्रामीण रुग्णालयात (Government Rural Hospital) संपूर्ण कपडे काढून फिरणाऱ्या डॉक्टरावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात पैठण तालुक्यातील (Paithan Taluka) बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयाचा एक व्हिडिओ (Video) समोर आला होता. ज्यात शासकीय सेवा देणारा एक डॉक्टर (Doctor) नग्न (naked) अवस्थेत रुग्णालयात फिरत होता. याबाबतचे वृत्त 'एबीपी माझा'ने प्रसारित केले होते. त्यानंतर संबंधित डॉक्टरला शासकीय सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. 


अधिक माहितीनुसार, संभाजीनगरपासून 20 किलोमीटरवर असलेल्या बिडकीन गावात ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात अनेक डॉक्टर आहेत. याच रुग्णालयात डॉ. केयुर चाकूरकर हा नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. मात्र, त्याला नशेची सवय असल्याने तो अनेकदा रुग्णालयात नशा करून येत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो गांजा पिऊन थेट रुग्णालयात यायचा. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तो नशा करून ग्रामीण रुग्णालयात आला. यावेळी रुग्णालयाच्या परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या आयसीयूमध्ये प्रवेश करून, त्याने अंगावरील सर्व कपडे काढले. नग्न अवस्थेत तो संपूर्ण आयसीयूमध्ये फिरू लागला. तिथे असलेल्या वाश रूममध्ये तोंड देखील धुतले. हा सर्व प्रकार तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. 


डॉक्टर कार्यमुक्त....


बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या आयसीयूमध्ये एक डॉक्टर नग्न अवस्थेत फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यावर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, याबाबतचे वृत्त 'एबीपी माझा'ने 7 मार्च रोजी प्रसारित केले होते. त्यानंतर याची गंभीर दखल घेत संबंधित डॉक्टरला तात्काळ कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती बिडकीन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय दळवी यांनी दिली आहे. 


डॉक्टरला नशेची सवय....


मागील काही वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नशेचे प्रमाण वाढले आहेत. खास करून अनेक तरुण या नशेच्या आहारी जातांना पाहायला मिळत आहे. मात्र, हा नशेचा बाजार आता थेट शासकीय रुग्णालयापर्यंत जाऊन पोहचला असून, शासकीय सेवा देणारे डॉक्टर सुद्धा नशा करत असल्याचे या घटनेनंतर समोर आले आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा डॉक्टर प्रचंड नशेच्या आहारी गेला होता. त्याला गांजा पिण्याची सवय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच रुग्णालयात असलेल्या काही औषधांचा वापर करून देखील तो नशा करत होता. विशेष म्हणजे रुग्णालयात याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. परंतु, वरिष्ठ अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याची चर्चा आहे. 


संबंधित बातमी : 


Chhatrapati Sambhaji Nagar Crime : धक्कादायक! नशेत तर्रर शासकीय डॉक्टराचा ग्रामीण रुग्णालयातच कपडे काढून....; व्हिडीओ लीक