Chandrapur Crime : अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी चंद्रपूर पोलीस (Chandrapur Police)  दलातील एक पोलीस कर्मचारी आणि इतर चार जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे चंद्रपूर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी पोलीस कर्मचारी सचिन बावणे याला तात्काळ निलंबित केले आहे. सचिन बावणे हा C-60 दलातील पोलीस कर्मचारी आहे.


काय आहे घटना?


चंद्रपूर (Chandrapur) शहरालगत असलेल्या मामला परिसरात काल (4 जुलै) दोन जोडपे फिरायला गेले होते. मात्र त्याठिकाणी चारचाकी वाहनाने पोहोचलेल्या पाच तरुणांनी दारु पिऊन धिंगाणा घातला. त्यांनी  जोडप्यांना मारहाण करत अल्पवयीन मुलीची (Minor Girl) छेड काढली. ही दोन्ही जोडपी मोटारसायकल उभी करत त्यावर बसून होते. त्याचवेळी चंद्रपूरकडे जाणारं एक चारचाकी वाहन थांबलं. त्या वाहनामधील तरुणांनी जोडप्यांमधील दोन मुलांना अश्लील शब्दात शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने मुली घाबरल्या. मारहाण करणारे युवक हे दारुच्या नशेत होते. मुलींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता आणखी एक चारचाकी वाहन घटनास्थळी आलं. त्यामधील दोघांनी जोडप्यांना अश्लील शब्दात शिवीगाळ केली.


अल्पवयीन मुलीची छेड, तरुणांच्या विरोधात तक्रार दाखल


या जोडप्यांमधील मुलगी अल्पवयीन होती. आरोपींपैकी दोघांनी एका मुलीला जबरदस्तीने वाहनात बसवलं आणि एकाने तिची छेड काढली. यातून मुलीने कशीबशी सुटका करुन घेतली. यानंतर अल्पवयीन मुलीने त्या पाच तरुणांच्याविरोधात तक्रार दाखल केली. मुलीच्या तक्रारीनंरत पोलीस कर्मचारी सचिन बावणेसह पाच जणांना अटक करण्यात आली. तसंच पोलीस कर्मचारी सचिन बावणेला तात्काळ निलंबित देखील केलं. 


C60 मध्ये कार्यरत आरोपी पोलीस कर्मचारी तक्रारीनंतर निलंबित


दरम्यान या प्रकरणातील पोलीस कर्मचारी हा C-60 दलात कार्यरत आहे. तर संतोष कुशवाह, महेंद्रसिंह सनोतरा, शंकर पिल्ले आणि संतोष कानके अशी अटक केलेल्या इतर चार आरोपींची नावं आहेत. हे सगळे चव्हाण कॉलनीमधील रहिवासाठी आहेत. संबंधित प्रकाराच्या वेळी आरोपी पोलीस कर्मचारी सचिन बावणे दारुच्या नशेत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीची जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी गंभीर दखल घेतली आहे. आरोपी पोलीस कर्मचारी सचिन बावणे याला तातडीने निलंबित करण्यात आलं आहे.


हेही वाचा


Chandrapur Crime : प्रेमाला नकार दिल्याने 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकलं, मुलीने प्रतिकार केल्याने अनर्थ टळला