चंद्रपूर : येत्या काळात गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केले आहे. गडचिरोली पोलीस दलामार्फत “आपला जिल्हा, आपला महोत्सवाचं" आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार, असे देखील ते या वेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या काळात गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती या माध्यमातून होणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या तिजोरीला गडचिरोली जिल्ह्याचे देखील मोठे योगदान असणार आहे. महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे. आता उलट म्हणावं लागेल महाराष्ट्रातला पहिला जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोलीतून महाराष्ट्राची सुरुवात होते .
गडचिरोली जिल्ह्यातील विकासाची यात्रा आता सुरू
गडचिरोलीत मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वे येणार आहे. सोबतच समृद्धी महामार्गसुद्धा गडचिरोलीपर्यंत येत आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी ही मुंबईला देखील जोडणार आहे. गडचिरोलीला पोर्टशी जोडण्याकरिता एक अभ्यास गट निर्माण केला आहे. हा अभ्यास गट गडचिरोलीच्या नद्यांमधून जहाजाची वाहतूक करून आंध्र प्रदेशच्या फोर्टपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी कशी निर्माण करता येणार याच अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास गट निर्माण केला आह. त्यामुळे प्रचंड मोठा विकास होणार आहे . गडचिरोली जिल्ह्यात विकासाची यात्रा आता सुरू झाली आहे ही यात्रा आता थांबणार नाही.
गडचिरोलीत मुक्काम करणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
गडचिरोलीत मुक्काम करणारे महाराष्ट्राचे पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा आतापर्यंत दोन वेळा मुक्काम केला आहे. गृहमंत्री म्हणून पोलिस दलाच्या पाठिशी ठाम संदेश त्यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यापासून नव्या सरकारच्या काळात 16 महिन्यात सातवा गडचिरोली दौरा आहे. आज वांगेतुरीत नागरिकांना भेटणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. गेल्यावर्षी या भागात दोन पोलिस ठाणे सुरु केली. येथून 11 कि.मी. अंतरावर नक्षल्यांचे आश्रयस्थान आहे. 15 ऑगस्ट 2023 ला त्यांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कोठी कोरनार पुलाचे उद्घाटन केले. तेव्हा पिंपळी बुर्गी येथे भेट देणारे ते राज्याच्या इतिहासातील पहिले गृहमंत्री किंवा राजकीय नेते ठरले होते. हा भाग इतका संवेदनशील की तेथे कोणताही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आजवर गेले नव्हते.
हे ही वाचा :