चंद्रपूरः राज्यभरात गुंतवणुकीच्या नावावर सुमारे 100 कोटी रुपयांचा घोटाळा (Invesment Scam) कलकाम या कंपनीने केला. याला स्थानिक मनसे नेत्यांनी (Local MNS leaders) संरक्षण आणि समर्थन दिल्याचा आरोप करत या कंपनीद्वारे फसवणूक झालेल्या पीडितांनी राज ठाकरे यांच्यासमोर आंदोलन (Protest in front of Raj Thackeray) केले. रियल इन्फ्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर सामान्यांची फसवणूक करण्यात आली असा दावा करत पीडितांनी राज ठाकरे उतरलेल्या हॉटेलसमोर निदर्शने केली.


राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर (Vidarbha Tour) असून सोमवारी रात्री ते चंद्रपूरला पोहोचले आणि त्यांनी आज मंगळवारपासून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. राज ठाकरे स्वतः शहरात असल्याची माहिती मिळताच या कंपनीच्या पीडितांनी (All together defrauded by the company) एकत्र येण्यास सुरुवात करुन राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलच्याबाहेर धरणे देण्यासाठी बसण्याचा निर्णय घेतला. यावेळी पदाधिकारी यांनी राज ठाकरे आता भेटू शकत नसल्याचे सांगितल्यावर संतप्त नागरिकांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याशिवाय आपण उठणार नसल्याचा निर्धार केला.


राज्यभरात शंभर कोटींचा घोटाळा?


रियल इन्फ्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कलकाम कंपनीला स्थानिक मनसे नेत्यांनी संरक्षण दिले आहे. तसेच त्यांना समर्थन देऊन पाठीली घालून गुंतवणूकदारांना धमकावणे आदी उद्योग सुरु केल्याचा आरोप केला आहे. यात स्थानिक मनसे नेते भरत गुप्ता (Bharat Gupta) आणि प्रतिमा ठाकूर (Pratima Thakur) या पदाधिकाऱ्यांची नावेही नागरिकांनी घेऊन राज ठाकरेंकडून न्यायासाठी दाद मागितली आहे. यापैकी काही पीडितांना मनसे नेत्यांनी धमकावून मारहाण केल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे यावर राज ठाकरे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईपासून चंद्रपूर पर्यंत पसरलेल्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या या गुंतवणूक घोटाळा (Invesment Fraud) या कंपनीने केला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.


कार्यकर्त्यांसह मान्यवरांच्याही भेटी


 चंद्रपूर दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहरातील वकील, उद्योजक, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाऊंट्स, अशा मान्यवरांची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या विस्तारासाठी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनाही ठाकरे यांनी सूचना केल्या.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याआधी शिवसेनेचा धमाका? शिंदे गटाच्या बंडानंतर पहिल्यांदाच गटप्रमुखांना उद्धव ठाकरे संबोधन करणार


Vedanta Foxconn : अडीच महिन्यात असं काय झालं की, फॉक्सकॉन राज्यातून गुजरातला गेला? संभाजी ब्रिगेडचा राज्य सरकारला सवाल