Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात दोन ग्रामस्थांचा वाघाच्या हल्ल्यात (Chandrapur Tiger Attack) मृत्यू झाला. गणेशपिपरी येथे काल (26 ऑक्टॉबर) शेतात चारा कापत असताना अलका पेंदोर या 43 वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात (Tiger Attack) मृत्यू झाला होता, तर आठ दिवसांपूर्वी गणेशपिपरी जवळ असलेल्या चेकपिपरी गावात भाऊजी पाल या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. गेल्या आठ दिवसात वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Continues below advertisement

अशातच, सततच्या वाघाच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग जाम केला आहे. चंद्रपूर-अहेरी महामार्गावरील गोंडपिपरी येथे संतप्त ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा महामार्गावर गेल्या दोन तासांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. यावेळी महामार्गाव मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Leopard attack in Wardha : वर्ध्यात बिबट्याच्या हल्ल्यात सात बकऱ्या ठार

वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील वाढोना परीसरात असलेल्या हरासी गावामध्ये गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्यावर रात्री दरम्यान हल्ला केलाय. यात गोठ्यात दावणीला बांधून असलेल्या सात बकऱ्या ठार झाल्या आहे. हरासी हे गाव जंगल परिसराला लागून आहे. शेतकरी प्रवीण जाधव यांच्या गावालगतच गोठ्यात बिबट्याने बांधून असलेल्या बकऱ्यांवर हल्ला केलाय. शेळीपालकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वनविभागाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होते आहे.

Continues below advertisement

Umred Pauni Karhandla Sanctuary : शॅडो वाघिणीचा तीन बछड्यांसह रोड शो

उमरेड-पवनी कऱ्हांडला व्याघ्र अभयारण्य शॅडो वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या वाघिणीचं कुटुंब बघण्यासाठी राज्यातूनचं नव्हे तर, भारतातील कानाकोपऱ्यातून आणि विदेशातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात या वाघ्र प्रकल्पात येत असतात. भंडाऱ्याच्या पवनी पोलिसांचं एक पथक मध्यरात्रीच्या सुमारास पवनी ते खापरी या व्याघ्र प्रकल्पातील गावाच्या पेट्रोलिंगवर होतं. हे पथक पवनीकडे परत येत असताना शॅडो वाघीण ही तिच्या तीन बछड्यांसह अचानक या पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनासमोर आलं. या वाहनात असलेले पोलीस कर्मचारी सूर्या खराबे यांनी वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांच्या या रोड शोचं दृश्य त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केलं. व्याघ्र दर्शनासाठी दूरवरून आलेल्या पर्यटकांना अनेकदा व्याघ्रदर्शन होत नाही. मात्र, पेट्रोलिंगवर असलेल्या या पोलिसांना अचानक या वाघिणीचा तिच्या तीन बछड्यांसह रोड शो बघायला मिळाल्यानं त्यांना एक वेगळाच आनंद आणि दिलासा मिळाला. 

इतर महत्वाच्या बातम्या