Frankenstein Movie Review: मॅक्सिकन दिग्दर्शक गिलर्मो डेल टोरो (Mexican director Guillermo del Toro) बुसानमधल्या (Busan) जीवीसी थिएटरमध्ये आला. फुलपॅक थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याच्या हातात फॅँकेस्टाईन (2025) सिनेमाचं पोस्टर होतं. माईक हातात घेऊन तो थेट प्रेक्षकांशी संवाद साधू लागला. फ्रँकेस्टाईन (1818) ही गोष्ट लहानपणी वाचली होती. तेव्हापासून त्यात मला सिनेमाच दिसत होता. मरी शेलीच्या या कादंबरीवर आजवर दोन-चार सिनेमे बनलेत. या सिनेमात माझं स्वत:चं भावविश्व आहे. लहानपणी या पुस्तकानं मला वाचक म्हणून समृध्द केलं. आज सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून तिच तोच अनुभव घेतोय. जर तुम्ही लहानपणी ही कादंबरी वाचली असाल तर पुन्हा आपलं बालविश्व अनुभवाल, असा माझा दावा आहे. असं म्हणताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि सिनेमा सुरु झाला. 

Continues below advertisement

फ्रँकेस्टाईन (2025) हा गॉथिक हॉरर सायन्स फिक्शन जॉन्राचा सिनेमा आहे. आता गॉथिक हॉरर म्हणजे नक्की काय? असा प्रश्न पडेल. 18 आणि 19 व्या शतकातल्या साहित्य-कला शैलीत पहिल्यांदा गॉथिक शैलीचा वापर झाला. रहस्य, भीती, अलौकिकता, एकटेपणा, अंधार अश्या गोष्टींचा समावेश गॉथिक शैलीत होतों. गॉथिक हॉरर जॉन्रात वातावरण निर्मितीवर जास्त भर असतो. त्यातून प्रेक्षकांना भीती, अस्वस्थता आणि त्याचं आकर्षण अश्या परस्पर विरोधी गोष्टी एकाचवेळी अनुभवायला मिळतात. फँकेस्टाईन (2025) सिनेमात हेच घडतं. 

व्हिक्टर फ्रँकेस्टाईन नावाचा एक डॉक्टर वेगवेगळ्या मृत शरिरांचे भाग जोडून एकसंध मानवी शरीर (क्रिएचर) तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्यात तो यशस्वी ही होतो. मग पुढे नेमकं काय घडतं? यावर फ्रँकेस्टाईन सिनेमाचा डोलारा उभा केला गेलाय. सिनेमा दोन भागात आहे. पहिला डॉक्टर फ्रँकेस्टाईनच्या नजरेतून घडतो, तर दुसरा भाग हा त्याने निर्माण केलेल्या क्रिएचरच्या नजरेतून. या दोन्ही दृष्टीकोनात प्रचंड तफावत आहे. माणूस भव्य दिव्य करण्याच्या नादात आपलं माणूसपण हरवून जातो. तर या सनकी माणसाच्या कल्पनेतून तयार झालेला राक्षसी क्रिएचर हा जास्त इमोशनल असतो. त्याला प्रेम हवंय. शेप ऑफ वॉटर (2018) या सिनेमात दिग्दर्शक गिलर्मो डेल टोरोनं हे खुप चांगल्या पध्दतीनं दाखवलेलं आहे. फँकेस्टाईनमध्ये क्रिएचरला प्रेमाची आसक्ती जरा जास्त आहे. ज्याने आपल्याला घडवलं त्यानं आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला, हे त्याला असह्य होतंय. हा क्रिएचर अमर आहे, त्याला प्रेमाची आसक्ती आहे. आपल्याला फ्रँकेस्टाईननं मारण्याचा प्रयत्न का केला असेल याचा तो शोध घेतोय. ते करताना तो जास्त भावनिक झालाय. हा शोध प्रेक्षकांना वेगळ्याच जगामध्ये घेऊन जातो. मग तो फ्रँकेस्टाईन आणि क्रिएचरमध्ये पुढे काय होतं. यावरचा हा उत्कंठावर्धक सिनेमा आहे. 

Continues below advertisement

व्हिजव्हल स्टाईलची भव्यता :

दिग्दर्शक गिलर्मो डेल टोरो दृश्यात्मक भव्यतेसाठी ओळखला जातो. पॅन लॅबीरिंथ (2007) आणि शेप ऑफ वॉटर (2018) या दोन्ही सिनेमातून प्रेक्षकाला त्याचा अनुभव आला आहे. पाहण्याचा अनुभव हा भव्य झाला पाहिजे यावर डेल टोरोचा भर असतो. आपण स्वप्न पाहतो, स्वप्नांना आणि कल्पनेला मर्यादा नसतात. विचारांनी त्यांना रोकता येऊ शकत नाही. असं डेल टोरोचं म्हणणं आहे. थ्रिलर सिनेमात ही भव्यतेची अनुभूती मिळणं म्हणजे सोने पर सुहागा टाईप फिलींग आहे. डेल टोराच्या प्रत्येक सिनेमात ती अनुभवायला मिळते हे विशेष. 

डेल टोराच्या फ्रँकेस्टाईन (2025) सिनेमात स्पेशल इफेक्टवर जास्त भर दिलेला नाही. भव्य दिव्य सेट आणि जहाज जिथं हे कथानक घडतं ते तयार करण्यात आलंय. डॉक्टर व्हिक्टर फ्रँकेस्टाईनची (आयजॅक ऑस्कर)  प्रयोगशाळा देखील तयार करण्यात आलीय. शेकडो प्रॉडक्शन डिजायनर्सनी हा सेट बनवला आहे. त्यामुळं त्याला मानवी टच जास्त आहे. डेल टोरो म्हणतो, "मला माझ्या भावविश्वातली गोष्ट सांगायला एआय किंवा स्पेशल इफेक्टची गरज नाही. भव्यता तयार करता येते. त्याला प्रॉम्प्ट आणि स्पेशल इफेक्टची गरज नाही. ती खुप पर्सनल असते. आपल्या मनातली. माझ्या मनात ही भव्यता लहानपणापासून होती. ती मी सध्या पडद्यावर साकारतोय. प्रेक्षक त्याला कनेक्ट होतात. याचा अर्थ त्यांच्या मनातली भव्यता, भीती ते अनुभवतात."

पिनोकियो (2022) ला सर्वोकृष्ठ एनिमेटेड फ़िल्म आणि शेफ़ ऑफ वॉटर (2018) साठी डेल टोराला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सिनेमा असे तीन ऑस्कर पुरस्कार आहेत. फ्रँकेस्टाईन ही याच स्पर्धेत उतरला आहें. व्हिक्टर फॅँकेस्टाईनची भूमिका करणारा आयजॅक ऑस्कर आणि मॉन्सटर क्रिएचर साकारणारा जेकब इलोर्दी यांनी कमालीची कामं केलीयत. माणूस आणि मॉन्स्टरच्या संघर्षात  एक लव्ह स्टोरी ही फ्रँकेस्टाईनमध्ये आहे. प्रेम, आसक्ती, आकस, द्वेष असे भरपूर काही सिनेमात दिसतं.  आक्राळ-विक्राळ शरीराचा हा मॉन्स्टर कसा माणूस बनत जातो आणि माणसाचा कसा श्वापद होतो, अशी ही गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहण्याची मजा और आहे. सिनेमात रक्त, गोर आणि डार्क फॅन्टसीचे मिश्रण आहे, ते रोमँटिक आणि ट्रॅजिक आहे, ज्यामुळे तो एक 'गॉथिक ओपेरा' वाटतो. संगीतकार अलेक्झांड्रे डेस्प्लॅटने दिलेल्या लिरिकल स्कोअरमुळे (ज्यानं द शेप ऑफ वॉटर आणि पिनोकिओसाठी डेल टोरोसोबत काम केले आहे) कथा अधिक भावपूर्ण होते. 

भीतीतली भव्यता अनुभवायची असल्यास फ्रँकेस्टाईनला पर्याय नाही.

पाहा ट्रेलर : 

नरेंद्र बंडबे यांचे इतर काही ब्लॉग :