Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यांवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर सडकून टीका केली आहे. आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही, एवढे लबाड देवाभाऊ बोलतात असे म्हणत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर प्रहार केलाय. दरम्यान याच टीकेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खास विश्वासू परिणय फुकेंनी (Parinay Fuke) प्रत्युत्तर दिलं आहे. बच्चू भाऊ मंत्री राहीले आहेत. सरकारमध्ये पाच वर्ष त्यांनी काम केलंय. याप्रकारे बच्चू कडू यांचे वागणं चुकीचं आहे. नेहमी स्टंटबाजी करणं, लोकांना वेठीस धरणं चुकीचं आहे. अशी प्रतिक्रिया परिणय फुकेंनी दिली आहे.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफी होणार, पण आता राज्याची आर्थिक स्थिती ठीक नाही. या वर्ष ते दीड वर्षांत कर्जमाफी होणार. जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही पाळणार असेही भाजप नेते परिणय फुकेंनी (Parinay Fuke) सांगितलं.
Parinay Fuke on Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार हे गोंधळले
तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नागपुरात मोर्चा काढला, त्यांच्यावर टीका झाली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनात जाऊन त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली होती. सध्या विजय वडेट्टीवार हे गोंधळले आहेत. त्यामुळे अशा बैठका घेत आहे. असेही परिणय फुके म्हणाले.
दुसरीकडे, याच मुद्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली कि, उद्या, (मंगळवारी) 10.30 वाजता मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे. ती बैठक परिणामकारक होईल. मागण्या मान्य झाल्या तर मोर्चाची गरज राहणार नाही. शासना सोबतच्या बैठकीतून जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळतो, स्वतः मुख्यमंत्री बैठक घेत आहे, या बैठकीत सर्वच विषयावर चर्चा होईल, त्यांनी शासनाला निवेदन दिले आहे, त्यावर बैठक होईल, तोडगा निघणार असा विश्वास आहे. असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
Chandrashekhar Bawankule on Ravindra Dhangekar : महायुतीत मनभेद तयार होणार नाही, आमची सर्वांची जबाबदारी
दरम्यान, महायुतीत मनभेद तयार होणार नाही, याची काळजी आम्हाला सर्वांना घ्यायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा सर्वांना सूचना दिल्या आहे की महायुतीत मतभेद होऊ देऊ नका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि सर्व टीमला अशा प्रकारच्या सूचना देतील. अजीत दादा ही देतील. महायुतीत मनभेद तयार होणार नाही, याची आमची सर्वांची जबाबदारी आहे. असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या