Capricorn Horoscope Today 08th March 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस  चांगला जाईल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. पैशाशी संबंधित कोणतीही समस्या आज सुटू शकते आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. जवळचे मित्र आणि रागाने तुमचा ताबा सुटू शकतो पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल.

Continues below advertisement

वेळेचा सदुपयोग करा

तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. आज प्रेमाच्या बाबतीतही तुमचा दिवस चांगला जाईल. व्यस्त दिनचर्येनंतरही जर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकत असाल तर तुम्ही या वेळेचा सदुपयोग करा. असे केल्याने तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता. जास्त खर्चामुळे पार्टनरबरोबर वाद होण्याची शक्यता आहे.  

चांगली बातमी मिळण्याची शक्यता

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात जाईल. नोकरदारांना आज त्यांचे रखडलेले पैसे मिळतील, त्यामुळे त्यांची रखडलेली कामे पूर्ण होतील. आज तुम्ही तुमच्या पार्टनरला नवीन काम सुरू करण्यासाठी प्रोत्साहन करू शकता. यामध्ये तुमचंही सहकार्य गरजेचं आहे. कुटुंबीयांसह पार्टीला उपस्थित राहाल. सर्व लोकांशी सलोखा होईल. 

Continues below advertisement

आज मकर राशीसाठी आरोग्य :

मकर राशीच्या लोकांचे आरोग्य पाहता आज तुमच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य सांभाळा, बाहेरचे अन्न खाणे टाळा.

मकर राशीसाठी आजचे उपाय :

मकर राशीसाठी आज मंत्रांसह सूर्यनमस्कार करणे खूप फायदेशीर दिसेल.

मकर राशीसाठी आजचा शुभ रंग कोणता? 

मकर राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, त्यांचा लकी नंबर 2 आहे.    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 08th March 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना शुभ लाभ होतील, तुमच्या नशिबाचे तारे काय म्हणतात? राशीभविष्य जाणून घ्या