बुलढाणा: आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे चर्चेत येणारे शिवसेना शिंदे गटातील बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या कारनाम्यामुळे चर्चेत आले आहेत. इतर वेळी ते धमक्या देण्यासाठी, मारहाण या गोष्टीमुळे चर्चेत येतात मात्र, यावेळी ते वेगळ्याचं कारणाने चर्चेत आलेत. आमदार गायकवाड (sanjay gaikwad) यांनी आपल्या लाडक्या पुत्राच्या वाढदिवसा निमित्त तलावारीनं केक भरवला आहे. हा फोटो सोशल मिडीयावरती चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (sanjay gaikwad) यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा काल बुलढाण्यात वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. काल रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला व कापलेला केक तलवारीनेच आपल्या पत्नी आणि मुलाला भरविला. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमात आता जोरदार व्हायरल होत आहे. सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल होतो, मात्र आता शिंदेंच्या शिलेदाराने तलवारीने केक कापून त्यास तलवारीने आपल्या पत्नी पूजा गायकवाड व मुलांना केक भरवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावर बुलढाणा पोलीस काय कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


‘या’ तीन प्रकरणांमुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड चर्चेत


एका महिलेची शेतजमीन हडपून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली न्यायालयाने बुलढाण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (sanjay gaikwad), त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड आणि आणखी दोघंविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. 


आपल्या गळ्यातील हारात वाघाचा दात असल्याचा दावा आणि ती शिकार आपण स्वतः केल्याचा दावा करणारे आमदार संजय गायकवाडांवर वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


बुलढाणा मतदारसंघात येणाऱ्या मोताळा शेत शिवारातील आपण देत असलेल्या भावात शेतजमीन आपल्या नावावर करून द्यावी लागेल, असा तगादा आणि सदर जमिनीवर अतिक्रमण करून फार्म हाऊस बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर गावात त्यांची दीड एकर शेती आहे. आमदार गायकवाड (sanjay gaikwad) यांनी 21 जुलै 2021 ला त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले. शेतजमिनीवरची कुंपणे त्यांनी काढून अवैधरीत्या फार्म हाऊस बांधले, शेतजमिनीत उत्खनन केले, मुरूम काढला. याचिकाकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला, तेव्हा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यासह काही जणांविरोधात ऑगस्ट 2021 रोजी बोरखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.