Purushottam Khedekar : नाशिक (Nashik) येथील काळाराम मंदिरातील पुरणक्य वेदोक्त प्रकरणानंतर मराठा सेवा संघाचे (Maratha Seva Sangh) संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) चांगलेच संतापले आहेत. राज्यातील सर्व मंदिरातील ब्राह्मण पुजारी हटवण्याची मागणी पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. शिवाय राज्यातील आणि देशातील मंदिरातील पैसा गरिबांसाठी, त्यांच्या मुला मुलांसाठीच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 


देशातील सर्व मंदिरे भट मुक्त करा ,मंदिरातील पुजारी हटवा अशी मागणी पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. दरम्यान, आगामी काही दिवसात मराठा सेवा संघाकडून मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुरुषोत्तम खेडेकरांच्या या वक्तव्यामुळं राज्यात पुन्हा एक नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. याआधीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आहेत. कधीकाळी भाजपच्या जवळ असलेले खेडेकर सध्या उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत. अनेकदा त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणे होत असते. 


पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य 


अलीकडेच पुरुषोत्तम खेडेकर यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर अप्पा साहेब यांच्यापेक्षा अनेक चांगली लोक जगात आहेत अशी तीव्र शब्दात टीका केली होती. 


12 जानेवरी रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या मेळाव्यात त्यांनी मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, असं वक्तव्य केलं होतं.


मविआ सरकारच्या काळात त्यांनी केंद्र सरकारवर टीका करताना केंद्र सरकार राज्यपालांची पाठराखण करत असल्याचा आरोप केला होता.


अनेकदा त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.


पुरुषोत्तम खेडेकर यांनी राज्यातील मंदिरे भटमुक्त करा असं म्हणत सर्व मंदिराची संपत्ती ही गोर गरिबांच्या मुला मुलींसाठी आणि शिक्षणासाठी खर्च करण्याचं सांगून एक नवीन वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांना आगामी काळात रोषांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. 


नेमकं प्रकरण काय?


रामनवमीच्या दिवशी पार्श्वभूमीवर संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास (Nashik Kalaram Mandir) भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. यावेळी महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. हा सगळा प्रकार संयोगीता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर विविध क्षेत्रातून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव; संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नीच्या पोस्टने खळबळ