सिंदखेडराजा: स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची आज 426वी जयंती आहे. या मंगलदिनी विदर्भातील  बुलढाणा (Buldhana ) जिल्ह्यातील सिंदखेडराजा (Sindkhedaraja) येथे लाखों लोक जिजाऊंना वंदन करण्यासाठी दखल होत आसतात. आज योगायोगाने  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रात होते. त्यांनी आज जिजाऊंना वंदन करण्यासाठी सिंदखेडराजा येथे यायला हवं होत. मात्र, ते आले नाही, कारण त्यांना सर्वसामन्यांची काळजी नाही. अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. मनोज जरांगे पाटील आज जिजाऊ जयंती निमित्य जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सिंदखेडराजा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे. 


.... कारण त्यांना सर्वसामन्यांची काळजी नाही


राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त आज, शुक्रवार 12 जानेवारीला मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो शिवप्रेमी जिजाऊ प्रेमी दाखल झाले. लखुजी राजे राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थानी नतमस्तक होण्यासाठी आज पहाटे पासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले. यांच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे आज जिजाऊंना वंदन करण्यासाठी  सिंदखेडराजा येथे आले होते. यावेळी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. जरांगे पाटीलांनी जिजाऊ जन्मस्थाळचे दर्शन घेत  जिजाऊंना अभिवादन केले. यावेळी बोलतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. योगायोगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात होते. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. त्यांनी आज सिंदखेडराजा येथे येऊन जिजाऊंना अभिवादन करणे अभिप्रेत होते. अशी तमाम शिवप्रेमी आणि जिजाऊ प्रेमींची मागणी देखील होती. मात्र ते आले नाही, कारण त्यांना सर्वसामन्यांची काळजी नाही. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


दोन्ही गाद्यांचा मी सन्मान राखतो


 उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही. कारण मी कोल्हापूरची गादी असो, किंवा साताऱ्याची गादी असो, या दोन्ही गाद्यांचा मी सन्मान राखतो. मात्र सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायलाच हवं, मग ते कसं द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


मराठ्यांना न्याय देऊनच मरेल


आजित पवार मराठा आंदोलकांवर कारवाईची भाषा करत आहेत. त्यांनी आमच्या आंदोलकांवर कारवाई करूनच दाखवावी.  आम्ही आमच्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने मुंबईला येत आहोत, आणि आरक्षण घेतल्या शिवाय आम्ही परत जाणार नाही. मला मरण आल तरी चालेल पण मराठ्यांना न्याय देऊनच मरेल. त्यामुळे सरकारने भानावर यावं असा इशारांच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या