बुलढाणा: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) आज सकाळी भीषण अपघात झाला. मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 304 येथे ही घटना घडली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून दोघं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील मृतक आणि जखमी छत्तीसगडमधील रहिवासी आहेत. अपघातात एक जण जागेवरच ठार झाला, तर इतर दोघे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावले. पोलिसांकडून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.


मृतकांची नावे 


1.लताबाई पुरुषोत्तम मेहेर
2.मुकेश अनुज राम मेहेर
3.अत्मजा मुनोरबोद


समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच!


समृद्धी महामार्गावरील एकामागोमाग एक अपघातांचे सत्र पाहता हा महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असल्याचं समोर येतंय. सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी आतापर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही थांबत नसून महामार्ग सुरू झाल्यापसून अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. अपघातांच्या मालिकेनंतर समृद्धीवर प्रवास करायचा की नाही? असा प्रश्न आता पडत आहे.


आणखी वाचा