बुलढाणा: अनेक वर्षांपासून काम सुरू असलेल्या शेगाव - खामगाव मार्गावर काम पूर्ण करण्यासाठी मार्ग बनविणाऱ्या ठेकेदाराचा अजब नमुना समोर आला आहे. शिल्लक मार्गच काम लवकर पूर्ण करण्याच्या घाईत चक्क मध्यभागी पंक्चरचे दुकान तसेच ठेवून दुकानाच्या दोन्ही बाजूने काम करून ठेकेदार आता आपल बस्तान गुंडाळण्याचा तयारीत आहे.
चक्क महामार्गाच्या मध्यभागी दुकान
शेगाव - खामगाव महामार्गाच काम सुरू होऊन तब्बल पाच वर्ष झालीत. मात्र हा महामार्ग अद्याप ही पूर्ण झालेला नाही. गेल्या आठवड्यात हा महामार्ग पूर्ण असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खामगाव येथील सभेत जाहीर केलं. मात्र या महामार्गावर ठेकेदाराने एक मोठा प्रताप करून ठेवला आहे. या महामार्गावर एका ठिकाणी महामार्गाच्या बाजूला एक पंक्चर व टायर दुरुस्तीचे दुकान आहे. दुकान मालकाने हे दुकान न हटवल्याने ठेकेदाराने चक्क दुकान महामार्गाच्या मध्यभागी असलेले दुकान तसेच ठेवून दुकानाच्या दोन्ही बाजूने काम सुरू केलं आहे. सध्या हे काम सुरू असून या कामाकडे महामार्गावरून जाणारे नागरिक मात्र कुतूहलाने बघत आहे.
गेल्याच आठवड्यात या मार्गाच काम पूर्ण झालं असल्याची घोषणाही नितीन गडकरींनी खामगाव येथील सभेत केली होती. मात्र अपूर्ण मार्गच काम हे गडकरींना पूर्ण झाल्याच अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे उघड झाले आहे. मार्गच काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या नादात मात्र ठेकेदार मार्गाच्या मध्यभागी हे दुकान आहे हे विसरल्याच दिसतोय किंवा अत्याधुनिक सेवा वाहनधारकांना मिळावी म्हणून तर हे पंक्चर आणि टायर दुरुस्तीचे दुकान मार्गावर ठेवण्यात आल नसावं ना..? असा प्रश्न मात्र या मार्गावरून जाणाऱ्या भोळ्या भाबड्या वाहनधारकांना पडत आहे.
इगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संबंधित ठेकेदार या संदर्भात विचारणा केली असता या दुकानदाराने न्यायालयात मोबदल्यासाठी याचिका दाखल केलेली असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं. मात्र मग न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न होताच मार्गच काम कसं पूर्ण करण्यात येत आहे ? यावर त्यांनी मौन साधले. मात्र कॅमरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मात्र राज्यभरातून या मार्गाने शेगाव येथे जाणाऱ्या लाखो भाविकांना मार्गाच्या मध्यभागी असलेल्या या पंक्चर दुकानाच्या आधुनिक सुविधेचा फायदा मात्र मिळत आहे.
हे ही वाचा :