Buldhana News : आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांची मानसिकता ढासळली असल्याची टीका अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी केली. बुलढाण्यातील (Buldhana) सिंदखेड राजा इथे काल (1 सप्टेंबर) ते बोलत होते. भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक संघटना यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मुख्यालयी न राहता घरभाडे घेणारे शिक्षक शासनाची फसवणूक तर करतच आहेत पण आमच्या पिढ्या देखील बरबाद करत आहेत, असा आरोप आमदार बंब यांनी केला होता. तसंच शिक्षकांच्या चुकीच्या गोष्टींवर पांघरुन घालणारे शिक्षक आणि मराठवाडा मतदारसंघच रद्द करुन टाका, अशी खळबळजनक मागणी केली आहे. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार अॅड. किरण सरनाईक बोलत होते.


किरण सरनाईक यांनी पुढे सांगितलं की, "आमदार प्रशांत बंब यांचा विषय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. त्यासाठी तो विषय त्यांनी त्याच ठिकाणी लावून धरावा, तसेच शिक्षक, पटवारी , ग्रामसेवक यांच्याबद्दल अपशब्द काढले. त्यामुळे अनेक संघटना त्यांचा प्रतिकार करुन विरोध करत आहेत. त्यांच्याविरोधामध्ये मोर्चे काढत आहेत."


विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. आमदार विक्रम काळे यांच्या प्रश्नाला सर्व शिक्षक आमदारांनी उभे समर्थन दिले होते. आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक आणि ग्रामसेवक यांच्याबद्दल अपशब्द वापरले, त्याचा निषेध सभागृहामध्ये करण्यात आला होता. त्यावेळी सर्व शिक्षक आमदार सभागृहाच्या बाहेर निघून गेले होते. त्याचबरोबर सभागृहाच्या पायऱ्यांवर शिक्षक आमदार तसेच पदवीधर आमदार यांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले आहे.


प्रशांत बंब काय म्हणाले होते?
राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक बंद करुन बरखास्त करण्याची मागणी प्रशांत बंब यांनी केली आहे. या दोन्ही मतदारसंघाची आता गरज राहिली नसून, शिक्षकांचे प्रश्न इतर आमदार सुद्धा मांडू शकतात असेही आमदार बंब म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. आमदार बंब म्हणाले की, "यापूर्वी फक्त 3 टक्के सुशिक्षित लोकं विधानभवनात असायचे, त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते. आता सर्वच आमदार सुशिक्षित आहेत. त्यामुळे आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ बंद केले पाहिजे. त्यांची आता गरज राहिलेली नाहा. विशेष म्हणजे 20 वर्षांपूर्वीचं हे मतदारसंघ बंद केली पाहिजे होते. शिक्षक आणि पदवीधरचे बहुतांश आमदार शिक्षकांना खोटे सपोर्ट करतात. राहिला प्रश्न शिक्षकांच्या समस्यांचा तर सर्वच आमदार आता सुशिक्षित असल्याने ते शिक्षकांचे प्रश्न सुद्धा विधानभवनात मांडतील. 


संबंधित बातम्या