Buldhana News : शिवसेनेतील (Shiv Sena) महाबंडाळीनंतर  बंडखोर आमदार, शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांचे अनेक संवाद सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. यात पहिलं नाव सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचं घ्यावं लागेल. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या मदतीचे व्हिडीओ तसंच ऑडिओ यांचीही चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच, काहींना अडचणीत तात्काळ मदत करतानाचे अनेक व्हिडीओ यापूर्वी पाहिले असतील. त्यात आता आणखी एका ऑडिओ क्लिपची भर पडली आहे. शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत अशी भावना शेतकरी (Farmers) वर्गात निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय बुलढाण्यातील एका शेतकऱ्यांनी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना केलेल्या फोनची सध्या चर्चा सुरु आहे.   


वन्य प्राणी शेतात करत असलेल्या नुकसानीमुळे त्रस्त झालेल्या बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि आपले गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या संभषणाची सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात शेतकऱ्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं. उद्धवराजे नागरे असं असं या शेतकऱ्याचं नाव आहे.


देऊळगाव राजा तालुक्यातील वाकी बुद्रुक, बायगाव, मेंडगाव, पिप्रीआंधळे, अंढेरा, सेवानगर, धोत्रा नंदई, वाकी खुर्द, डोद्रा, अंचरवाडी या गावाजवळ वनविभागाचं क्षेत्र आहे. या जंगलातून गावात येणाऱ्या नीलगायी शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पूर्णपणे नष्ट करत आहेत. यामुळे शेतकरी त्रासला आहे. वारंवार वन विभागाकडे तक्रारी केली जात आहेत, मात्र अद्याप तरी या वन्य प्राण्यांचा कुठलाही बंदोबस्त झालेला नाही. अखेर त्रस्त झालेल्या वाकी बुद्रुक इथले शेतकरी उद्धवराजे नागरे यांनी काल (27 जुलै) रात्री आठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच कॉल केला आणि संबंधित त्रासाची कल्पना दिली. उद्धवराजे यांनी कॉल केला तेव्हा ते आपल्या शेतात वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करत होते.


दिवाळीच्या सुट्टीत मला गुवाहाटीला घेऊन जाणार का? चिमुकलीच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले...


मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आपल्यासोबत असलेल्या अधिकाऱ्याकडे फोन देऊन माहिती घेण्यास सांगितलं. "तुमच्या जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करायला सांगतो. तुमचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यासाठी संबंधितांना बोलतो, असं बोलून अधिकाऱ्याने शेतकऱ्यांला कारवाईचं आश्वासन दिलं. सध्या ही ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. 


शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांचा फोनवरील  संवाद ..


शेतकरी - आमच्या बायगाव बुजरुक, बेंडगाव, अंढेरा धोत्रा, निलगायी भरपूर आहेत. शेतात नुकसान आहे, शेताचं नुस्कान करतात,..


मुख्यमंत्री - काय झाल?


शेतकरी - शेताचं नुस्कान करते नुस्कान..


मुख्यमंत्री - शेताचं नुकसान होतंय निलगायीमुळे?


शेतकरी - हा हा...


मुख्यमंत्री - अच्छा.. कुठला एरिया..देऊळगावराजा तालुक्यामधील बेंडगाव, बायगाव 


मुख्यमंत्री - बेळगाव 
एक मिनिट एक मिनिट..घ्या


अधिकारी - हॅलो हा सांगा आपला कुठला भाग आहे


शेतकरी - बेंडगाव, बायगाव अंढे रा, धोत्रा, शेताचं खूप मोठं नुकसान होतंय साहेबाला सांगा..


अधिकारी - आपल्या तक्रारीची नोंद घेतलीय आम्ही कलेक्टर आणि इतर अधिकाऱ्यांना माहिती देत आहोत


शेतकरी - बरं बरं