बुलढाणा: शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण मराठा की ओबीसी जाहीर कराव असं जाहीर आव्हान बुलढाण्याचे (Buldhana MP) खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं, त्याचाही प्रतापराव जाधव यांनी निषेध केला. 


नामदेव जाधव यांनी शरद पवारांवरील केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, नामदेव जाधव यांना काळं फासण्याच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. खरं तर नामदेव जाधव यांनी एका वेबसाईट वरून शरद पवार ओबीसी असल्याच प्रमाणपत्र काढलं होत. त्या वेबसाईटवर कारवाई करण्याचं सोडून जाधव यांना काळ फासण्यात आल. शरद पवार किंवा रोहित पवार यांनी मीडिया समोर येऊन शरद पवार मराठा की ओबीसी, खरं काय ते सांगावं. 


काहीतरी स्टंटबाजी करून ठाकरे गटाचा मीडियात जिवंत राहण्याचा प्रयत्न


हुल्लडबाजी आणि स्टंटबाजी करून मीडियात जिवंत राहण्याचा उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न असल्याची टीका प्रतापराव जाधव यांनी केली. ते म्हणाले की,  मुंबई येथे आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काहीतरी हुल्लडबाजी किंवा स्टंटबाजी करून ठाकरे गटाचे काही लोक मीडियात जिवंत राहण्याचा प्रयत्न करत आहेत.


नामदेव जाधवांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं


राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ओबीसी जातीचं असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते नामदेव जाधव यांन केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं होतं. या सगळ्या प्रकरणानंतर नामदेव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी यासंदर्भात गुन्हा दाखल करणार असून यामध्ये पहिलं नावं हे शरद पवार आणि रोहित पवारा यांचं असेल. तसेच त्या दोघांची आमदारकी, खासदारकी रद्द करण्याची मागणी देखील करणार असल्याचं नामदेव जाधव यांनी यावेळी म्हटलं होतं. 


माफी मागितली नाही म्हणून सांगून काळं फासलं


नामदेव जाधव हे हेतूपूर्वक राज्यात ओबीसी विरूद्ध मराठा असा असा संघर्ष उभा करत आहे. 1983 साली  शरद पवार मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षण लागू झालं अशी बतावणी हे नामदेव जाधव करत आहेत. वास्तविक पाहता 1983 साली पवार  विरोधी पक्षनेते होते तर ओबीसी आरक्षण हे 1990 च्या दशकात देण्यात आले आहे. म्हणूनच नामदेव जाधव करत असलेले आरोप खरे असतील तर त्यांनी पुरावे उघड करावेत अन्यथा पवार जाहीर माफी मागावी असा इशारा आम्ही नामदेव जाधव यांना दिला होता. अन्यथा त्याच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशी पूर्वसूचनाही दिली होती. असं असतानाही नामदेव जाधव यांनी पुरावे सादर केले नाहीत, पवारांची माफीही मागितली नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. 


ही बातमी वाचा: