नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांना भाजपमधूनच फटाके लावल्या जात आहे. जयस्वाल घोटाळेबाज आहेत, त्यांना मंत्री करण्यात येऊ नये अशी मागणीच भाजपच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. सोबतच त्यांच्या घोटाळ्याच्या सर्व फाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पुराव्यानिशी पाठवण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.


राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात यापूर्वीसुद्धा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आ. जयस्वालवर ३०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यावरून चौकशीस सुरुवात झाली होती, परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी ती चौकशी बंद केल्याचा आरोपही यावेळी डॉ. ठाकरे यांनी केला.


खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष असताना खिंडसी ते वैनगंगा या दरम्यान वाहत असलेल्या सूर नदीतील रेती उपसा करण्यासाठी जयस्वाल यांनी गरिबांच्या घरांसाठी माची मिश्रित वाळूच्या नावावर परवानगी मिळवली होती. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली. मॅक्सवर्थ कंपनीशी एका शेतकऱ्याचे धानविक्रीचे १४ लाख 52 हजार रुपये जयस्वाल यांनी हडपले असल्याचा आरोपही यावेळी ठाकरे यांनी केला. भाजपची प्रतिमा मलिन होऊ नये, म्हणून त्यांना मंत्रीपद देऊ नये. त्यांच्या घोटाळ्याच्या सर्व फाईल पुराव्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.


ईडीने चौकशी करावी


आमदार आशिष जयस्वाल यांनी केलेले घोटाळे बाहेर काढण्यासाठी ईडी तसेच सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी डॉ. राजेश ठाकरे यांनी केली.


इतर महत्तवाच्या बातम्या


Ashish Jaiswal Exclusive : राऊत-परब-देसाई-गोऱ्हे यांनी त्रास दिला; ठाकरेंची शेवटची मनधरणी करणारे आ. आशिष जयस्वाल यांची स्फोटक मुलाखत


CM Eknath Shinde : राज्यावरील दु:ख, संकट, सर्व अडचणी दूर होवो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विठुरायाला साकडं