Bipin Rawat Birthday Anniversary : देशातील पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (Late CDS Bipin Rawat Birthday Anniversary) यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (16 मार्च) देशभरातील लोकांनी आपल्या खऱ्या ‘हिरो’चे स्मरण केले. अनेक नेत्यांनी आणि देशभरातील लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही बिपीन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, 'ते वीर होते, रणधीर होते, एक अतुलनीय योद्धा होते. उत्तराखंडची शान, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि लष्करप्रमुख यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. जनरल बिपिन रावतजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.’
शत्रूला धडकी भरवणारे व्यक्तिमत्व!
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांची आज जयंती आहे. जनरल रावत हे नावच शत्रूला घाम फोडणारे होते. भारताच्या शत्रूंना उत्तर देण्यासाठी, त्यांच्या घरात घुसून त्यांना मारण्यावर बिपीन रावत यांचा विश्वास होता. हे त्यांनी अनेक प्रसंगी सिद्ध करून दाखवले आहे. बिपिन रावत हे तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखपदी नियुक्त झालेले पहिले अधिकारी होते. चार दशकांच्या कारकिर्दीत रावत यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांच्या सेवेत त्यांना डझनहून अधिक पदके आणि सन्मान मिळाले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा तामिळनाडूच्या उटीजवळ कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.
नेत्यांकडून देशाच्या खऱ्या नायकाला आदरांजली!
हेही वाचा :
- CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला? लवकरच येणार तपास यंत्रणेचा अहवाल
- 'माझ्या सेनेवर मला गर्व आहे', CDS बिपीन रावत यांचा शेवटचा संदेश व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha