मुंबई : महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांच्या कामाची दखल सरकारने घेतली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याआधी त्यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज त्यांचा सन्मान झाला होता.


कृषी क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी 'नारी शक्ती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कठीण परिस्थितीत केलेल्या कामाबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांनी 'माझा कट्टा'वर व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले होते. आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या कामाचे कौतुक अनेकांनी केले होते.

शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन करणाऱ्या बीजमाता अर्थात राहीबाई पोपरे यांना घर देखील नव्हतं. एबीपी माझाच्या बातमीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राहीबाई पोपरेंना नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोंबळणे गावात पक्क घर बांधून दिलं होतं. या घराला पावसाळ्यात गळती लागली होती.

महिला दिन विशेष : 'बीजमाता' राहीबाई पोपेरेंसह सहा महाराष्ट्रीय महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
राहीबाईंच्या देशी बियाणांच्या बँकेला सुरक्षित आसरा मिळावा म्हणून एबीपी माझानं बातम्यांच्या स्वरूपात विशेष मोहीम राबवली होती.

संबंधित बातम्या

बीजमाता राहीबाई पोपरेंना दिलेल्या घराला गळती, देशी बियाणांचा खजिना भिजण्याची भीती

WATCH VIDEO | देशी वाणाच्या बँकर राहीबाई पोपेरे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा