Bharat Rice : केंद्र सरकारने महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून फक्त 25 रुपये 'किलो'ने तांदूळ विकणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 'भारत' (Bharat Brand) नावाच्या ब्रँडचे दाळ आणि पीठ लाँच केले होते. यानंतर 'भारत'चाच तांदूळ (Bharat Rice) 25रूपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. सरकारने या तांदळाची योग्यरित्या विक्री व्हावी, यासाठी विशेष उपाययोजना केली आहे. यापूर्वी या ब्रँडच्या दाळींची आणि पीठाचीही विक्री सुरु करण्यात आली आहे.
कोठून होणार विक्री?
इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने भारत नावाच्या बँडचा तांदूळ केंद्र सरकारने लाँच केल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India), एनसीसीएफ (National Cooperative Consumers' Federation) आणि केंद्र सरकारने नेमून दिलेल्या स्टोअर्समध्ये हा तांदूळ विकला जाईल.
व्यापाऱ्यांना केंद्र सरकारचा इशारा
केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या भावांबाबत व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकार बासमती तांदूळ 25 रुपये 'किलो'ने उपलब्ध करुन देत आहे. मात्र, तरिही बासमती तांदळाचे भाव 50 रुपये 'किलो'वर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने तांदळाची साठवण करुन ठेवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सरकार तांदूळाची साठवण करुन भाव वाढवणाऱ्यांविरोधात अॅक्शन मोडवर आले आहे.
पीयुष गोयल यांची लाँच केला होता 'भारत आटा'
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी 27.50 रुपयांमध्ये मिळणारा 'भारत आटा' लाँच केला होता. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी 6 डिसेंबरला दिल्लीत हा आटा लाँच केला होता. भारत नावाच्या ब्राँडचे पीठ सध्या 10 आणि 30 किलोंच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. तांदळाप्रमाणेच आटाही नाफेड आणि एनसीसीएफ आणि इतर सहकारी संस्थांमध्ये उपलब्ध आहे. यासाठी सरकारकडून अडिच लाख मेट्रिक टन गहू सरकारी संस्थांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
कांदा अन् दाळींचीही केंद्र सरकारकडून विक्री
सध्या ब्रँडेड आटा 30 ते 40 रुपये प्रतिकिलो आहे. काही ठिकाणी याचा भाव 50 रुपयांपेक्षाही जास्त आहे. गव्हाचे भाव सातत्याने वाढल्यामुळे पीठाचेही भाव सातत्याने वाढतात. त्यामुळे नागरिकांना स्वस्तात पीठ उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने स्वस्तात 'भारत आटा' लाँच केला होता. तांदूळ, आटा याच्याशिवाय केंद्र सरकारकडून कांद्याचीही (onion) विक्री करण्यात येते.
इतर महत्वाच्या बातम्या
यापूर्वी केंद्र सरकारने या ब्रँडच्या दाळींची आणि पीठाचीही विक्री सुरु केली आहे.