भंडारा : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या पतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात (Pune Rave Party Case) शेकडो महिलांना विविध प्रलोभन देऊन फसवण्यात आले असल्याचा आरोप आहे. अत्यंत अश्लील पद्धतीने महिलांचे व्हिडीओ शूट करण्यात आले. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी महिला आयोगाने (State Women’s Commission) विशेष तपास पथक (SIT – Special Investigation Team) गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
महिला आयोगाची कारवाई
राज्य महिला आयोग गेल्या चार वर्षांपासून मानवी तस्करी (Human Trafficking) आणि महिलांवरील अन्याय या गंभीर मुद्यांवर काम करत आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माहिती दिली की, खेवलकरांच्या रेव्ह पार्टी प्रकरणात 250–300 पेक्षा अधिक महिलांना आमिष दाखवून फसवण्यात आले. या पार्टीदरम्यान मोबाईल आणि लॅपटॉपमधून अत्यंत अश्लील व्हिडीओ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश
या धक्कादायक प्रकरणात पीडित महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या सर्व तक्रारींच्या आधारे पुणे पोलीस आयुक्तांना (Pune Police Commissioner) कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना आयोगाने दिल्या आहेत. प्रकरणाचा तपास केवळ वरवर न होता, सखोल व्हावा यासाठीच SIT गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ह्युमन ट्रॅफिकिंगचा मोठा संशय
महिला आयोगाने व्यक्त केलेल्या शंकेनुसार, या प्रकरणाचा संबंध ह्युमन ट्रॅफिकिंग रॅकेटशी (Human Trafficking Racket) असू शकतो. रेव्ह पार्टीत आमिष दाखवून आणलेल्या महिलांचा अशा प्रकारे गैरवापर झाला असावा. भविष्यातही अशाच पद्धतीने महिलांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार होऊ नयेत, यासाठी कठोर उपाययोजना होण्याची गरज आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
कोण आहेत प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे.
ही बातमी वाचा: