Bhandara Water Crisis: सध्या देशासह राज्यातील अनेक भागात तापमानात (temperature) वाढ होत आहे. वाढत्या तापमानाच्या पाऱ्यामुळं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अनेक ठिकाणी तापमानाच्या पाऱ्यानं 50 अंशाचा पारा ओलांडला आहे. दरम्यान, तापमान वाढीमुळं भंडारा (Bhandara) जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झालीय. नागरिकांसह पशू पक्षी आणि वन्य प्राण्यांनाही फटका बसत आहे.


तलावानं गाठला तळ


प्रखर उष्णतेत भंडारा जिल्ह्यातील शेकडो तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. याचा फटका ग्रामीण नागरिकांना बसत आहे. ग्रामीण भागासह जंगलातीलही तलावांची हीच परिस्थिती आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफरीचं प्रवेशद्वार ज्या पिटेझरी गावात आहे. तेथील तलावानं कधीचाचं तळ गाठला आहे. पिटेझरीचा हा तलाव अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे. चारही बाजूंनी जंगल आणि टेकळ्यांच्या मधोमध हा तलाव असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आणि विवध प्रजातींचे पक्षी जलविहारासाठी येत होते. मोठ्या प्रमाणात वन्यजीव बघायला त्यांच्या आवाज ऐकायला, पक्षांचा किलबिलाट ऐकायला मिळत असल्यानं वन्यजीव अभ्यासकांची या तलाव परिसरात कधीकाळी बरीच गर्दी राहत असे. मात्र, आता तलावात पाणी नसल्यानं वन्यप्राणी आणि पक्षांचे थवेही बघायला मिळत नसल्यानं पशूपक्षी अभ्यासकही इकडं भटकत नाहीत. तलाव कोरडे पडल्यानं इथं वन्यप्राणी किंवा पक्षीही दिसून येत नाही.


महत्वाच्या बातम्या:


सावधान! देशातील अनेक शहरात उष्णतेच्या लाटेचा उद्रेक, कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांनी केल्या 'या' उपायोजना