Bhandara: भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगरच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात शुक्रवारी (22 जानेवारी) भली मोठी इमारत जमीनदोस्त झाली. या घटनेत 8 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 13 कामगारांना बाहेर काढण्यात आले.  दुपारी झालेल्या या स्फोटानंतर शेवटचा मृतदेह रात्री 8.15 वाजताच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. ॲडव्हान्स फॅक्टरीमध्ये स्फोटाच्या ठिकाणी खड्डा पडून मलबा कोसळला. यात अनेक कामगार गाडले गेले. यात कोणी पती गमावला तर कोणी मुलगा. अंगावर काटे आणणारा आक्रोश परिसरात होता. (Bhandara Factory Explosion)


इमारत कोसळण्याच्या भीतीने कामगार धावले, पण..


या फॅक्टरीच्या इमारतीच्या चौकात महामार्गावर असणाऱ्या संदेश असिया यांच्या नाष्टा स्टॉलवर नेहमीप्रमाणे कामगार, नागरिक चहा व नाष्टा साठी आले होते. सगळं सुरळीत असताना अचानक कानठळ्या बसविणाऱ्या स्फोटाचा आवाज आला. आवाजाने इमारतही हलल्यासारखी वाटली. इमारत पडण्याच्या भीतीने साऱ्या ग्राहकांनी हातामधील चहा नाश्ता  सोडून बाहेर धाव घेतली. हा स्फोट एवढा मोठा होता की याचे हादरे थेट भंडारा शहरापर्यंत गेले. अनेक घरांना हवेच्या दाबाचा धक्का बसला. अवघ्या काही मिनिटात इमारत बेचिराख झाली. (Bhandara Factory Explosion)


बर्फाळ प्रदेशात  बर्फ फोडून काढण्याची क्षमता असणाऱ्या 'लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह'ची निर्मिती भंडारा येथील आयुध निर्माणीमध्ये केली जाते. भंडारा शहरापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर साहुली गावाजवळ ही फॅक्टरी आहे. हजारो कामगार या फॅक्टरीत वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आणि शिफ्टमध्ये काम करतात. स्फोट नेमका कसा झाला याचे कारण अस्पष्ट असल्याने नागपुरातून सेंट्रल फॉरेन्सिक टीमसह, तज्ज्ञांची पथके दाखल झाली आहेत. दरम्यान, मृत कामगारांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदतीसह कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समावेश करण्याची मागणी केली आहे. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह घरी नेणार नाही असा आक्रमक मृत कामगारांच्या कुटुंबियांनी घेतलाय. (Factory disaster news)


आयुध निर्माणी येथे झालेल्या मृतांचा व जखमींचा यांचा तपशील 


मृत 


चंद्रशेखर गोस्वामी 59 वर्षे 
मनोज मेश्राम 55 वर्षे 
अजय नागदेवे 51 वर्षे 
अंकित बारई 20 वर्षे 
लक्ष्मण केलवडे वय अंदाजे 38
अभिषेक चौरसिया वय 35
धर्मा रंगारी वय 35 वर्ष 
संजय कारेमोरे 32


जखमींची नावे 


एन पी वंजारी 55 वर्षे 
संजय राऊत 51 वर्ष 
राजेश बडवाईक  33 वर्षे 
सुनील कुमार यादव 24 वर्षे 
जयदीप बॅनर्जी 42 वर्षे


हेही वाचा:


Bhandara Factory Explosion : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या स्फोटातील मृतांचा आकडा 8 वर, प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन


Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली