मुंबई : प्रत्येकालाच माझ्याजवळ सोन्याचे दागिने असावेत असे वाटते. मात्र शुद्ध सोन्याच्या नावाखाली अनेकदा फसवणूक होते. अनेकजण शुद्ध सोन्याच्या नावाखाली कमी दर्जाच्या सोन्याचे दागिने विकतात. हॉलमार्क असलेला दागिना हा खऱ्या सोन्यापासून तयार केलेला आहे, असे समजले जाते. मात्र आजकाल बनावट हॉलमार्क असलेले दागिने विकले जात असल्याचीही प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे शुद्ध सोने कसे ओळखावे? सोन्याचे दागिने खरेदी करताना नेमकं काय तपासावं? हे जाणून घेऊ या....


 ब्‍युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजेच BIS संस्थेचे हॉलमार्क असेल तर सोन्याच्या दागिन्यात कोणतीही गडबड नाही, असे गृहित धरले जाते. नियमानुसार सोन्याचा कोणताही दागिना विकताना BIS ने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकराक असते. 14, 18 आणि 22 कॅटे सोन्याचे दागिने विकण्याचा नियम आहे. म्हणेच तुम्हाला एखादा ज्वेलर 20, 21 अशा कॅरेटचे सोने विकत असेल तर तुमच्यासोबत फसवणूक होत आहे, असे गृहित धरावे. 24 कॅरेटचे सोने सर्वाधिक शुद्ध असते. मात्र 24 कॅरेट सोन्याचे दागिने तयार केले जात नाहीत. एखादा ज्वेलर तुम्हाला 24 कॅरेटचे सोने विकत असेल तर तुमची फसवणूक होत आहे, हे गृहित धरावे. 


हॉलमार्कचे चिन्ह कसे ओळखावे? 


हॉलमार्कचे चिन्ह हे त्रिकोणी असते. यासह हॉलमार्क असलेल्या दागिन्यावर 6 अंकांचा हॉलमार्क यूनीक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID क्रमांक असतो. या कोडमध्ये काही इंग्रजी अक्षरं आणि अंक असतात. प्रत्येक दागिन्याचा HUID क्रमांक वेगळा असतो. कोणत्याही दोन दागिन्यांचा क्रमांक हा सारखा नसतो.  22 कॅरेट सोन्यावर 916, 18 कॅरेट सोन्यावर 750 तर 14 कॅरेट सोन्यावर 585 हा क्रमांक लिहिलेला असतो. या अंकांवरून तुम्ही दागिना नेमका किती कॅरेटचा आहे, हे ओळखू शकता. 


हॉलमार्क खरे की खोटे, नेमके कसे तपासावे?


ब्‍युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचे BIS Care नावाचे एक अॅप आहे. या अॅपच्य मदतीने तुम्ही तुमच्या दागिन्याची शुद्धता तपासून शकता. सोने तपासण्यासाठी तुम्हाला Verify HUID या ऑप्शनवर जावे लागेल. त्यानंतर तुमच्या दागिन्याचा HUID नंबर टाकावा लागेल. तुमचा दागिना खरा असेल तर त्या दागिन्याची सर्व माहिती तुम्हाला लागेच उपलब्ध होईल. 


सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?


सोन्याचे दागिने खरेदी करताना सर्वांत अगोदर सध्या बाजारात सोन्याचा भाव काय आहे, हे तपासावे.  24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट और 14 कॅरेट सोन्याचा भाव वेगवेगळा असतो. 22 कॅरेट दागिन्यात 91.66 टक्के सोनं असतं. 18 कॅरेट सोन्यात 75 टक्के सोने असेल. 14 कॅरेट दागिन्यात 58.1 टक्के सोनं असतं.  


हेही वाचा :


आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!


बापरे बाप! 10 हजारांचे झाले तब्बल 5300000 रुपये, एका वर्षात 'या' शेअरने अनेकांना केलं मालमाल!