आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
महिनाभर काम करून आलेला पगार अवघ्या काही दिवसांत संपून जातो, अशी अनेकजण तक्रार करतात. पगार पुरत नाहीये, या एका कारणामुळे अनेकजण बचतही करत नाहीत. संपूर्ण आयुष्यभर काम करूनही अनेकांनी बचत केलेली नसते. मात्र खालील पाच टिप्स फॉलो केल्यास तुमच्या बँक खात्यात मोठी रक्कम जाम होऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबचत- पगार झाल्यानंतर त्यातील काही भाग बचत म्हणून राखून ठेवला पाहिजे. आर्थिक नियमानुसार तुमच्या पगारातील 20 टक्के रक्कम ही बचत म्हणून ठेवली पाहिजे.
गुंतवणूक- फक्त बचत करून तुमचे पैसे वाढणार नाहीत. त्यामुळे ते योग्य ठिकाणी गुंतवले पाहिजेत. योग्य ठिकाणी पैसे गुंतवल्यास त्या पैशाचे मूल्य वाढते. SIP, PPF, FD, शेअर बाजार आदी वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ह तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवू शकता.
कर्ज- फारच गरज असेल तेव्हाच कर्ज घ्यावे. फिरण्यासाठी, आवडीच्या गोष्टी करण्यासाठी कर्ज घेऊ नये. एकादे कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्जही घेऊ नये, तसे केल्यास तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता.
क्रेडिट कार्ड - अनेक बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड देण्यासाठी तयार असतात. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला पैसे खर्च करायला मिळतात. मात्र कसलाही विचार न करता क्रेडिट कार्ड वापरले तर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. त्यामुळे फारच गरज असेल तरच क्रेडिट कार्डचा वापर करा.
सांकेतिक फोटो
सांकेतिक फोटो