बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या (Beed) कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडचे एका मागोमाग एक असे अनेक कारनामे समोर आले आहेत. यापूर्वीच वाल्मिक कराड (Walmik karad) आणि गँगने घातलेला बीड जिल्ह्यातील धुमाकूळ पाहाता पोलिसांना त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली असून सध्या तो आणि त्याच्यसाह संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी तुरुंगात आहेत. याप्रकरणी, न्यायालयीने सुनावणीला सुरुवात देखील झाली असून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे फिर्यादीच्या बाजुने युक्तिवाद करत आहेत. त्यातच, आता वाल्मिक कराडची आणखी एक जुनी ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral) होत असून एका दलित कुटुंबाला शिवीगाळ करण्यात आल्याचे कथित ऑडिओमधून समोर आलं आहे. तसेच, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेसोबतचा फोटोही व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement

वाल्मिक कराडने पैशांच्या कारणावरून एका कुटुंबाला शिवीगाळ केल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. या कथित ऑडिओ क्लिपची पृष्टी एबीपी माझा पुष्टी करत नाही. विशेष म्हणजे एकेकाळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत काम करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनीच ही ऑडिओ क्लिप समोर आणली असून कराडवर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत. तसेच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेसोबत असलेला फोटो देखील बांगर यांनी माध्यमांसमोर आणला आहे. वाल्मिक कराडने बांगर कुटुंबांच्या असलेल्या शाळांची देखील मागणी केली होती, वाल्मिक हा कराड किलर माणूस असून सायकोपेक्षा बेकार आहे. त्याच्याबाबत असलेले पुरावे घेऊन मुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांकडे जाणार असल्याचंही विजयसिंह बांगर यांनी म्हटले.

7 जुलै रोजी कोर्टात सुनावणी

दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणी झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव आणि विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यात आज तब्बल दोन तास युक्तिवाद झाला . वाल्मिक कराडच्या वकिलांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीनही गुन्हे वेगवेगळे आहेत. प्रत्येक FIR ची वेगवेगळी चार्जशीट झाली पाहिजे असा मुद्दा मांडला. त्यावर सरकारी वकील उज्वल निकम यांनीही जोरदार प्रतिवाद केला असून  डिजिटल पुरावे, या संपूर्ण केसचा हेलिकॉप व्ह्यू घ्यावा, असा युक्तिवाद करत 50 मिनिटांत प्रतिपक्षाचे सर्व मुद्दे खोडले. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार असून गत सुनावणीत कोर्टाचे कामकाज 3 तास चालले .

Continues below advertisement

हेही वाचा

धक्कादायक! आमदार प्रसाद लाड यांचा AI द्वारे खोटा आवाज; बीडमध्ये पत्र अन् बोगस सहीने 3 कोटी 20 लाखांचा घपळा