बीड : वाल्मिक कराडवर लावण्यात आलेला मकोका हा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला असून संतोष देशमुख हत्येशी त्यांचा काही संबंध नाही असा दावा कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी केली. बजरंग सोनवणे यांनी आपल्या पतीला जीव मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला. नवीन एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई असून ते सुरेश धस यांच्या जवळचे आहेत. या सर्वांनी मिळून अल्पसंख्यांक असलेल्या वंजारी समाजाच्या दोन्ही मंत्र्यांना संपवण्यासाठी वाल्मिक कराड यांना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप मंजिली कराड यांनी केला. 

Continues below advertisement

संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर त्यावर त्याच्या पत्नी मंजिली कराड यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर आरोप केले. वंजारी समाज अल्पसंख्यांक असल्यानेच त्याला दाबण्यासाठी आपल्या पतीवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

वाल्मिक कराड त्यावेळी परळीत नव्हते, पत्नीचा दावा

घटना घडली त्यावेळी वाल्मिक कराड हे परळीत नव्हते. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा दावा मंजिली कराड यांनी केला. बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी माझ्या पतीने मदत केली असंही त्या म्हणाल्या.  

Continues below advertisement

वंजारी समाजाच्या नेत्यांना संपवण्यासाठी हा कट

मंजिली कराड म्हणाल्या की, "सरकार स्थापन झालं तेव्हा दोन मंत्री हे आमच्या वंजारी अल्पसंख्यांक समाजाचे होते. ते मराठा नेत्यांना पटलं नाही. त्यावेळी तुमची माती करतो असं सुरेश धस म्हणाले होते. वंजारी समाजाचे दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड याला संपवणे गरजेचे असल्याने त्यांना बळीचा बकरा केला. यामध्ये जातीय समीकरण जोडण्यात आलं आणि त्यांना अडकवण्यात आलं."

SIT चे प्रमुख आष्टीचे जावई, सुरेश धसांचे जवळचे

नवीन एसआयटी नेमण्यात आली असून त्यामध्ये प्रमुख असलेले बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. ते सुरेश धस यांच्या जवळचे असून या दोघांचा आठ दिवसांचा सीडीआर काढावा अशी मागणी मंजिली कराड यांनी केली. एसआयटीमधील हे अधिकारी बदल. त्यामध्ये कुणाचेच नातेवाईक नको अशी मागणीही त्यांनी केली.  

मंजिली कराड म्हणाल्या की, "वंजारी समाज अल्पसंख्यांक असल्याने समाजला दाबण्यासाठी हे सगळं सुरु आहे. ज्यांचा खून झाला त्यांच्या आणि माझ्या नवऱ्याचा संबंध नाही. त्यांचा साधा एक फोनही झालेला नाही. त्यांची एकमेकांची ओळखदेखील नाही. ते परळीच्या बाहेर गेले नाहीत. तुम्ही केजमधील मर्डर प्रकरणात नावं घेता."

मंजिली कराड म्हणाल्या की, "आज वाल्मिक कराड यांचा जामीन झाला असता. पण 302 मध्ये चौकशी करायची असं सांगण्यात आलं. 302 चा आमचा काही संबंध नाही. या आधी पंधरा दिवस तुम्ही काय केलं? तेव्हा का चौकशी का केली नाही? तुम्ही वेडेवाकडे फाटे फोडले तर आम्ही सहन करणार नाही. उद्या आम्ही रस्त्यावर उतरू."

ही बातमी वाचा: