Walmik Karad MCOCA : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे.  वाल्मिक कराड (Walmik Karad) याआधी 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. वाल्मिक कराडवर मकोका कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. आज वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच वाल्मिक कराडवर मकोका देखील लावण्यात आला आहे. आता यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


धनंजय देशमुख म्हणाले की, या हत्याकांडातील जे आरोपी आहेत मग ते कोणी पण असो, त्या सगळ्यांना 302 आणि मकोकामध्ये घेण्यात यावं, अशी आमची प्रमुख मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, आम्ही कुणालाही सोडणार नाही आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. आम्ही न्याय मागत आहोत आणि कायम न्यायाच्याच भूमिकेतच राहू, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.  


सर्वांना शिक्षा झाली पाहिजे


काल तुम्ही आंदोलन केलं तर तपासाच्या गतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आज वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. याबाबत विचारले असता धनंजय देशमुख म्हणाले की, आम्ही एसआयटीचे प्रमुख तेली साहेब यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. त्यानंतर ते आम्हाला स्पष्टीकरण देतील. आमची त्यांना एकच मागणी आहे की, तपास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. एका लोकप्रतिनिधीची निर्घुण हत्या घडली आहे, ती कोणी घडवून आणली? कशा पद्धतीने झाली? यात कोण कोण सहभागी आहे? या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, अशा भूमिकेत आम्ही असल्याचे त्यांनी म्हटले.  


सीआयडीकडे काही पुरावे असतील 


वाल्मिक करायच्या हत्या प्रकरणात ताबा देण्यात यावा, असा अर्ज सीआयडीने कोर्टात दाखल केला आहे. याबाबत विचारले असता धनंजय देशमुख म्हणाले की, त्यांच्याकडे काही पुरावे असतील त्याच्याशिवाय सीआयडी दावा करणार नाही. या प्रकरणात पहिली सुनावणी 31 डिसेंबरला झाली. त्यावेळी त्यांनी दावा केला होता की, खंडणी ते खून प्रकरण यामध्ये कनेक्शन आहे. त्याविषयीचे काही पुरावे त्यांच्याकडे असतील, त्यानुसार सीआयडी केला असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 


आणखी वाचा 


Walmik Karad : मोठी बातमी : वाल्मिक कराडची मातोश्री मैदानात, लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या