बीड: नारायण राणे (Narayan Rane) यांच्या घरचं रेशन हे भाजप पुरवतं, त्यामुळे ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुटुंबीयांच्या विरोधात बोलतात अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काढलेली मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा शनिवारपासून बीडमध्ये आली असून या यात्रेचा आज 14 वा दिवस आहे. याच यात्रेदरम्यान राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या घडामोडीवरून सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर चांगलीच टीका केली.
नारायण राणे यांच्या घरच रेशन भाजप पुरवतं
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राणेंवर जोरदार टीका केली. नारायण राणे यांच्या घरचे रेशन हे भाजप पूरवतं, म्हणून ते ठाकरे कुटुंबीयांच्या विरोधात बोलतात असं सुषमा अंधारे म्हणाल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपचे सर्वच नेते राष्ट्रपती राजवट लागू करा असं म्हणत होते. त्यामुळे नारायण राणे यांनी इतरांना अक्कल शिकवू नये अस सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पोरं गुंडाच्या घरी जाऊन बसतात, त्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणीस यांनी दोन पक्ष फोडले असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या.
ऊसतोड महामंडळ मजुरांसाठी की नेत्यासाठी?
सुषमा अंधारे यांनी आपल्या मुक्त संवाद यात्रेदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ऊसतोड मजुरांशी देखील त्यांनी संवाद साधला. ऊसतोड मजुरांच्या कल्याणासाठी ऊसतोड महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र या महामंडळाला जो निधी मिळतो तो नेमका कुठे जातो असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
ऊसतोड कल्याण महामंडळ हे ऊस मजुरांसाठी आहे की नेत्यांसाठी आहे असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला. बीड जिल्ह्याचं राजकारण हे ऊसतोड मजुरांच्या भोवती फिरतं, मात्र त्या मजुरांसाठी अद्याप कोणत्याच उपाययोजना होत नाहीत किंवा महामंडळ त्यांच्या कुठल्याच कामाला येत नसल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
ही बातमी वाचा: