Suresh Dhas:गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे अवैध कृत्य खोदून काढत या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या सुरेश धस यांनी आका आणि त्याचे आका असा उल्लेख केला होता. आता या प्रकरणात वाल्मिक कराडच या संपूर्ण घटनेचा सूत्रधार असल्याचं सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटलंय . (Suresh Dhas)

Continues below advertisement

वाल्मिक कराड हाच या संपूर्ण घटनेचा सूत्रधार आहे .वाल्मिक कराडलाच खंडणी हवी होती .ती खंडणी मिळवण्यासाठी आवादा कंपनीभोवती जाळ विणण्याचं काम गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू होतं .अधिकाऱ्यांच्या अंगावर पोरं पाठवणे ..सुदर्शन घुले ,प्रतीक घुले बाकीचे सगळे प्यादे आहेत .या संपूर्ण प्रकरणाचा ब्रेन वाल्मीक कराडच आहे . दोन नंबरला विष्णू चाटे आणि त्याखाली हाताखालची ही पोर असा क्रम आहे .

आरोपी वाढण्याची शक्यता

संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली आहे .या तक्रारींची छाननी केल्यानंतर कदाचित यात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचं सुरेश धस म्हणालेत . खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या दोन्ही तिन्ही घटना एकत्र आहेत .त्यामुळे नियम ( 34 ) अन्वये या सगळ्या घटनांची सामुदायिक नोंद करण्यात आली आहे .म्हणजे यातील सर्व लोक हे सारखेच जबाबदार आहेत .कोणी मारायला आहे कोणी फोनवर आहे .कुणी आदेश सोडणारे आहेत .प्रमुख सूत्रधार तर वाल्मिकच आहे .बाकीचे सगळे प्यादे म्हणून वापरले गेलेत . असेही धस म्हणाले.

Continues below advertisement

एसआयटीने केलेला तपास अगदी योग्य आहे .यातील अधिकाऱ्यांनी अतिशय शिताफीने 80 दिवसात आरोपपत्र दाखल केलं आहे .कारण मकोका अंतर्गत आत गेलेले आरोपी 90 दिवसांनंतर जामिनासाठी अर्ज करू शकतात .त्यामुळे 80 दिवसातच आरोप पत्र दाखल केलं असल्याचंही धस म्हणाले . आता या आरोपींचा फास आवळणार आहे .

वाल्मिकनं बीडच्या 11 तालुक्यात कशी दहशत पसरवली?

वाल्मिक कराडचं दहशतीचा कार्यक्षेत्र आधी परळी पुरतच होतं .त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात त्यांना ते केलं . पाटोदा तालुक्यात गँग तयार केली .शिरूर तालुक्यात गॅंग तयार केली .लोकसभेच्या नंतर अतिशय भडकाऊ प्रकारचे स्टेटमेंट केले .ते व्हायरल करायचे . विनाकारण 307 सारखी कलम लावायला लावणं .स्वतः फोन करून सांगायचं . पालकमंत्र्यांनी सांगितलं होतच ना ..मग वाल्मिक अण्णा कुठेही बोलायला लागले .मग बीडच्या 11 तालुक्यात ते बोलायला लागले .या सगळ्या तालुक्यांमध्ये दहशत गुंडगिरी आणि चुकीच्या लोकांची बाजू घेऊन अन्याय करणाऱ्याच्या बाजूने राहायचं अशी दहशत वाल्मिक कराडने पसरवल्याचं सुरेश धस यांनी सांगितले .

हेही वाचा

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडच मास्टरमाईंड, पण नेमका कसा? आरोपपत्रातील 5 खळबळजनक उल्लेख!