पुणे : बीड आणि परभणीच्या मुद्द्यावर भेटण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे भेट मागत आहे, पण दोन आठवडे झाले तरी ते वेळ देत नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. वाल्मिक कराडला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कुणी केले? असा प्रश्न त्यांनी केला. तुम्ही पीए आणि ओएसडीबाबत एवढी कडक भूमिका घेता, मग धनंजय मुंडेंवर एवढे आरोप असताना त्यांच्याबाबत वेगळी भूमिका का? असाही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला. मुख्यमंत्र्यांनी जसा पीएस आणि ओएसडींच्या नियुक्तीबाबत चाप लावला आहे तसा चाप त्यांच्या मंत्र्यांनाही लावला पाहिजे असं सुळे म्हणाल्या. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,"गेले दोन आठवडे मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागत आहे. या सगळ्या गोष्टीसाठी राजकारण बाजूला ठेवून मी वेळ मागत आहे. बीड, परभणीला जाऊन आल्यापासून वेळ मागत आहेत. मला पाच मिनिट वेळ हवा आहे पण तरीही वेळ मिळत नाही."

दोन-चार लोकांमुळे बीडची बदनामी

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "कृष्णा आंधळे गायब कसा झाला असा प्रश्न विचारत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीड जिल्ह्याची बदनामी दोन चार लोकांमुळे होत आहे. राज्यात नव्हे तर देशात बदनामी होत आहे. व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बातम्या मी बघितल्या आहेत, मात्र एक खून माफ आहे असं दिसतंय."

कोकाटे आणि मुंडेंना वेगळा न्याय का? 

माणिकराव कोकाटे आणि मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही तो प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे. सुनील केदार यांच्यावर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा  दिला. मग सुनील केदार यांना एक न्याय आणि माणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय कसा? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. 

पुणे आरोपीला चौकात फाशी दिली पाहिजे 

स्वारगेटला जी घटना झाली, ज्यापद्धतीने हाताळली गेली ती चुकीची आहे. गलिच्छ घटना झाली त्यानंतर संवेदनशील प्रतिक्रिया दिल्या पाहिजे होत्या. ही केस फास्ट ट्रक कोर्टात चालवून आरोपीला चौकात फाशी दिली पाहिजे.  तुम्ही लाडकी बहीण योजना राबवतात आणि तुमच्या नेत्यांकडून असे वक्तव्य येत आहेत हे निषेधार्ह आहे.  

रोहित पवारांचे सिलेटिव्ह वक्तव्य काढले जाते.रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड सरकारवर तुटून पडत आहेत. तरी देखील त्यांचे एखादं वक्तव्य काढलं जात आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

ही बातमी वाचा: