Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली? संपू्र्ण घटनाक्रम जाणून घेऊयात..
9 डिसेंबर संतोष देशमुख यांचा अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे पुढे आले..
10 डिसेंबर या हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना केज तालुक्यातील तांबवा या ठिकाणाहून अटक झाली..
12 डिसेंबरला घुले या तिसऱ्या आरोपीला पुण्याच्या रांजणगाव येथून अटक झाली..
18 डिसेंबरला विष्णू चाटे याला बीडमधून अटक करण्यात आले..
4 जानेवारी ला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे ला पुण्यातून अटक झाली..तर सिद्धार्थ सोनवणे याला कल्याण मधून अटक झाली..
याप्रकरणी कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी सध्या फरार आहे..
कशी झाली संतोष देशमुखांची हत्या ?
6 डिसेंबरला आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हे खंडणी मागण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे मारहाण केली..त्यामुळे त्याने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांचे साथीदार भांडण सोडवण्यासाठी गेले. मात्र तिथे परत भांडण वाढले आणि यात दोन गटात भांडण झाले.. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला..
यानंतर अशोक सोनवणे यांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधामध्ये केज पोलीस स्टेशनमध्ये आवादा एनर्जी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने तक्रार दिली..सुदर्शन घुले व इतर तीन जणांविरोधात केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला..9 डिसेंबरला दुपारी तीन वाजता संतोष देशमुख यांचे केज- मांजरसुबा हायवेवरच्या टोलनाक्यावरून काळ्या स्कार्पिओ गाडीतून आलेल्या मारेकर्यांनी अपहरण केले..अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याने पोलिसांना फोन लावून याची माहिती दिली. पोलीस सुद्धा संतोष देशमुख याचा शोध घेऊ लागले..
याच दरम्यान रात्री सहा साडेसहा वाजता संतोष देशमुख यांचा मृतदेह दैठणा फाटा या ठिकाणी सापडला..
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर उघड झाले संतोष देशमुख हत्याकांडातील वास्तव..
6 डिसेंबरला ज्यावेळी सुदर्शन घुले आणि त्याच्या सोबतच्या साथीदाराला मारहाण झाली त्यामध्ये प्रतिक घुले हाही होता आणि याच दिवशी म्हणजे सहा डिसेंबरला प्रत्येक घुले याचा वाढदिवस होता...
वाढदिवसा दिवशीच आपल्याला मारहाण झाली हे शल्य प्रतीक घुलेच्या डोक्यात राहिले आणि त्यामुळेच संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर प्रतीक घुले याने मारहाण करायला सुरुवात केली..
संतोष देशमुख ला मारहाण करताना सुदर्शन घुले हा प्रत्येक वेळी विचारत होता की तू आम्हाला मारण्याची डेरिंग कशी केलीस आणि त्यानंतर व्हिडिओ कुणाच्या सांगण्यावरून केला हे वारंवार संतोष देशमुखला विचारत होता..
सहा तारखेला मारहाण झाल्यानंतर सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने संतोष देशमुख यांना फायटर.. गॅसचा पाईप.. काठी ने संतोष देशमुख ला मारहाण केली..
संतोष देशमुख यांचं अपहरण होण्यापूर्वी मसाजोग मधीलच सिद्धार्थ सोनवणे यांने सुदर्शन घुले ला संतोष देशमुख यांचं लोकेशन सांगत होता.. यादरम्यान संतोष देशमुख केज मधून निघाले यासह सगळ्या लोकेशन ची माहिती ही सिद्धार्थ सोनवणे यांनी पुरवली होती..
सुदर्शन घुले यांच्या स्कार्पिओ गाडीच्या मागे एक स्विफ्ट पांढरी गाडी होती जी जयराम चाटे याची आहे.. संतोष देशमुख यांचा अपहरण झाल्यानंतर स्कार्पिओ गाडीच्या मागे जयराम चाटे याची गाडी होती..
जयराम साठे यांनी त्याच्या व्हाट्सअप ग्रुप वरील "मोकार पंती"या व्हॉट्स अप ग्रुप वर व्हिडिओ कॉल करून संतोष देशमुख यांना मारहाण होण्याच्या आधीचा व्हिडिओ दाखवला.. या ग्रुपमध्ये 16 ते 19 वयोगटातील चार ते पाच जण यांनी काही वेळ हा व्हिडिओ कॉल बघितला..
संतोष देशमुख यांना जी मारहाण झाली त्यात प्रतीक घुले त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचा प्रमुख हात होता.. यावेळी इतर आरोपी सुद्धा मारहाण झाली त्या ठिकाणी उपस्थित होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी