बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात निलंबित पोलिसांसोबत जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांचा रंग खेळतानाचा फोटो अंजली दमानियांनी शेअर केला आहे. निलंबित पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच प्रकऱणात सक्तीच्या रजेवर असलेले पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा-सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत रंग खेळतानाचा हा फोटो दमानिया यांनी शेअर केला आहे. हा फोटो धुळवडीच्या दिवशीचा असल्याचा दावा दमानिया यांनी केला. या प्रकरणातील न्यायाधीशांकडून सुनावणी काढून घेऊन त्या ठिकाणी दुसरा न्यायाधीश देण्यात यावा अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली. 

Continues below advertisement

अंजली दमानिया म्हणाल्या की, "खंडणीचा जेव्हा कॉल करण्यात आला होता तेव्हा तिथे राजेश पाटील हा अधिकारी उपस्थित होता. तर प्रशांत महाजन याने आरोपींना अनेक वेळा मदत केली आहे. हे दोघेही केजच्या न्यायाधीशांसोबत धुळवड साजरी करत असतील तर हे धक्कादायक आहे."

न्यायाधीशांना हटवा

अंजली दमानिया म्हणाल्या की, "जजला कोड ऑफ कंडक्ट असतो, तशा प्रकारे त्यांना वागावं लागते. ज्याच्या हातात पूर्ण सुनावणी आहे असे जर अधिकारी लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ नये म्हणून कोड ऑफ कंडक्टप्रमाणे वागणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यामुळे आताच्या आता या प्रकरणातून न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांना हटवण्यात यावं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या न्यायाधीशांना अधिकार देण्यात यावेत."

Continues below advertisement

काय म्हटलंय अंजली दमानियांनी?

हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे, 

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत.

पण कोणाबरोबर ? 

संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधिश सुधीर भाजीपाले यांच्या सोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत. आता यांचे जर आरोपीला वाचणारे हे निलबित आधिकारी यांच्या सोबत केस चालू असताना, जज होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचे आहे.

संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस निरीक्षक प्रशांत महाजनला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे तर पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. सरपंच हत्या प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी प्रशांत महाजन याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राजेश पाटील हा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेसोबत अनेकदा दिसून आला. 

 

ही बातमी वाचा: