Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची (Santosh Deshmukh Murder Case) आज गुरुवारी (दि. 24) सुनावणी पार पडली.  यात वाल्मिक कराडने (Walmik Karad) दाखल केलेल्या डिस्चार्ज अ‍ॅप्लिकेशनवर सरकारी पक्षाने आपले म्हणणे दाखल केले. तर विष्णू चाटेच्या वकिलाकडून डिस्चार्ज अ‍ॅप्लिकेशन दाखल करण्यात आले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मे रोजी पार पडणार आहे. पुढील सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) उपस्थित राहणार आहेत. या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

आज गुरुवारी (दि . 24) आरोपी वाल्मिक कराड याने दाखल केलेल्या डिस्चार्ज अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाने आपले म्हणणे कोर्टात मांडले, तसेच मूळ फिर्यादीचे म्हणणे मागवले गेले आहे. मात्र, फिर्यादीकडून अजून म्हणणे सादर करण्यात आले नसल्यामुळे कोर्टाने पुढील तारीख दिली आहे.

चार्ज फ्रेम होण्याची स्टेज अजून आलेली नाही : विकास खाडे

वाल्मिक कराडचे वकील अॅड. विकास खाडे यांनी सांगितले की, चार्ज फ्रेम होण्याची स्टेज अजून आलेली नाही.  डिस्चार्ज अर्जावर सगळ्या पक्षांचे म्हणणे झाल्यावरच न्यायालय निर्णय देईल, आणि त्यानंतरच चार्ज निश्चितीची प्रक्रिया सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

डिजिटल पुराव्यांची प्रतीक्षा, सुनावणी तहकूब

या प्रकरणाच्या दोषारोपपत्रातील सर्व कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे अद्याप सर्व आरोपींना मिळालेली नाहीत. काही आरोपींचे जबाब सादर झाले असले तरी इतरांच्या जबाबांची अद्याप प्रतीक्षा आहे. त्यामुळे कोर्टाने आजची सुनावणी तहकूब केल्याचे माहिती देखील वाल्मिक कराडच्या वकिलांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. तर आमचा प्रथमदर्शनी कुठेही सहभाग दिसून येत नाही. ही बाजू आम्ही मांडली होती. यावर दोषारोप पत्रामधील पुराव्याच्या आधारे सरकारी वकिलांनी आपले म्हणणे मांडले आहे. त्यामध्ये काय पुरावे गोळा केलेत किंवा काय म्हणणे सादर केले? हे युक्तिवादातून समोर येईल, असेही वकील खाडे यांनी म्हटले.   

विष्णू चाटेच्या वतीने डिस्चार्ज अर्ज दाखल

दरम्यान,  आरोपी विष्णू चाटे याच्या वतीने देखील डिस्चार्ज अर्ज दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याला बीड कारागृहात हलवावे या मागणीसंदर्भात आज सुनावणी झाली. यावर कारागृह अधीक्षक व सरकारी पक्षाने आपले म्हणणे कोर्टात सादर केले असून, न्यायालयाच्या निर्णयाची आता प्रतीक्षा आहे.

आणखी वाचा 

Beed Crime Walmik Karad: 'आका' जेलमध्ये तरीही बीडमध्ये कार्यकर्त्यांची दहशत, वाल्मिक कराडबाबत पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक जबाब