बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात झाली आहे. सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंकडून या सुनावणीवेळी युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीसाठी धनंजय देशमुख उपस्थित आहेत. आरोपींवर आज चार्ज फ्रेम होण्याची शक्यता आहे. तर या प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले वैद्यकीय कारणास्तव तूर्तास गैरहजर असल्याची माहिती आहे. वाल्मीक कराड (Santosh Deshmukh Case) इतर आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) हजर आहेत.(Santosh Deshmukh Case) 

Continues below advertisement

Santosh Deshmukh Case: उज्वल निकम राजकीय पक्षाशी संबंधित त्यांना यातून बाजूला...

सकाळी 11 वाजता बीड न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणीला सुरुवात झाली आहे.सरकारी पक्षाचे सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरूवातीला युक्तिवाद केला. त्यानंतर वाल्मीक कराड आणि विष्णु चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्यांना यातून बाजूला करावे असा अर्ज न्यायालयाला दिला Eus.

Santosh Deshmukh Case: विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद

तर आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला आहे. विष्णू चाटे याचे सुरवातीच्या दोन एफआयआर (FIR)मध्ये नाव नाही तसेच त्यांच्यावर या पूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा युक्तिवाद चाटेच्या वकिलांनी केला. विष्णु चाटेकडून वारंवार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी करण्यात आली, असल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला आहे. विष्णु चाटे सुरूवातीपासून गुन्ह्यात सक्रिय आहे, असंही सरकारी पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

Continues below advertisement

Santosh Deshmukh Case: आरोपी सुदर्शन घुले चक्कर येऊन खाली पडला

सरकारी वकील उज्वल निकम यांच्याबाबत दिलेल्या अर्जाबाबत न्यायाधीशांनी निकम यांना कल्पना दिली. त्यानंतर निकम यांनी आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडत हा अर्ज रिजेक्ट करण्याची मागणी केली आहे. न्यायाधीशांनी आरोपी घुलेचे नाव पुकारताच आरोपी सुदर्शन घुले चक्कर येऊन खाली पडला. घटनेदरम्यानचे व्हिडिओ आरोपी वकिलांना देण्यात यावे मग आरोप निश्चिती केली जावी असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला आहे. जे व्हिडीओ ट्रायल कोर्टात नाही ते व्हिडिओ उच्च न्यायालयात दाखवले जातात आणि वातावरण भावनिक केले जाते. सरकारी पक्षाकडून आजच आरोपीच्या वकिलांना व्हिडिओज फाइल दिले जाणार असल्याची माहिती आहे.

अर्धा तास लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हमधील व्हिडीओबाबत युक्तिवाद पार पडला. आवादा कंपनीचे अधिकारी यांनी मोबाईलमधून डेटा लॅपटॉपमध्ये कॉपी केला आणि मोबाईलमधील सर्व डेटा डिलिट केला असे म्हणणे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडले. अद्याप आरोप निश्चिती झालेली नाही.