बीड : परळी हे शहर शरद पवारांना मानणारे आहे, त्यामुळे परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत (Parli Election) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकणार असा विश्वास खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी व्यक्त केला. परळीवर माझं पूर्ण लक्ष असून आपल्या पक्षाच्या उमेदवार संध्या देशमुख याच परळीच्या नगराध्यक्षा असतील असंही ते म्हणाले.
खासदार बजरंग सोनवणे यांनी परळीत पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून संध्या दीपक देशमुख यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी त्यांनी परळीचा नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचाच होईल असा विश्वास व्यक्त केला. परळी शहर हे शरद पवारांना मानणारे असल्याचं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.
बीड जिल्ह्यातील मधील सहा नगरपरिषदेच्या निवडणुका आम्ही लढवत आहोत. परळीत माझे पूर्ण लक्ष असून परळीचा नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा होणार आहे हे मी तुम्हाला आजच सांगतो.
Parli Nagarpalika Election : परळीत आमची ताकद जास्त
बजरंग सोनवणे म्हणाले की, "आमच्या पक्षाची ताकद बीड शहरात जास्त आहे. लोकसभेला बीडने मला तीस हजारांचं मताधिक्य दिलं होतं. बीड शहरावर आमची पक्षाची मदार आहे, हे शहर शरद पवारांना मानणारे आहे. परळी देखील पवार साहेबांना मानणारे शहर आहे. आता परळीचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि ते तुम्हाला दिसेल."
परळीत चुरशीची लढत
परळी नगरपालिका निवडणुकीसाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या एकत्र आल्या असून महायुतीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवणार आहेत. पण त्यांच्यासमोर संध्या देशमुख यांचे तुल्यबळ आव्हाण असणार आहे.
परळीसाठी संध्या दीपक देशमुख म्हणून आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केलं आहे. ताईंच्या पायात लक्ष्मी आहे, त्याच परळीच्या नगराध्यक्षा असतील हे मी शंभर टक्के सांगतो असं बजरंग सोनवणे म्हणाले.
संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख हे परळीचे माजी नगराध्यक्ष असून एकेकाळी धनंजय मुंडे यांचे विश्वासू समजले जायचे. नुकतंच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. परळीच्या नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने दीपक देशमुख यांच्या पत्नी संध्या देशमुख या निवडणूक लढवणार आहेत.
Beed Politics : धनंजय मुंडे यांच्यावर आरोप
दीपक देशमुख यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले .ते म्हणाले की, "आधी गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वादामध्ये माझे तिकीट कापले गेले होते. त्यानंतर मी अपक्ष उभा राहिलो. यात कोणीही श्रेय घ्यायचे काम नाही. परळीतील अर्धवट विकासकामांमुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यापासून मी या कामाला लागलो होतो. मी लोकसभेला पंकजा मुंडे यांचे काम केले. त्यानंतर विधानसभेला धनंजय मुंडे यांचे काम केले. परळीत होत असलेल्या बोगस मतदानाबाबत मी धनंजय मुंडे साहेबांना सांगितले होते की, आपण निवडून येऊ. पण, हे प्रकार थांबवले पाहिजेत. पण त्यावर त्यांनी काहीही केले नाही."
ही बातमी वाचा: