Municipal Council Parli Vaijnath: दीर्घ काळानंतर परळीच्या राजकारणात (Parli Municipal Election 2025) ऐतिहासिक घडामोड घडली आहे. परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे (Pankaja Munde Dhananjay Munde alliance) हे 15 वर्षांनी एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत दोघांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युती होणार आहे. या युतीवर आज दोन्ही नेत्यांकडून अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.

Continues below advertisement

नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार (Pankaja Munde Dhananjay Munde alliance) 

परळी नगर परिषदेच्या 35 जागांपैकी भाजप 12 ते 15 जागांवर, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) 20 ते 23 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2016 च्या निवडणुकीत भाजप महायुतीला केवळ 5 जागांवर विजय मिळाला होता, तर राष्ट्रवादी आघाडीने तब्बल 28 जागा जिंकून सत्ता हस्तगत केली होती. मात्र यंदा मुंडे बहीण-भावांच्या एकत्रित नेतृत्वामुळे (Munde siblings political alliance) परळीचा राजकीय समीकरणांचा पटच बदलणार असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे आगामी परळी नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

भाजपकडून बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

दरम्यान, भाजपकडून बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप पूर्ण झाले असून, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काल उशिरा संध्याकाळी पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून फॉर्म रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित काही जागांवरील उमेदवारांची घोषणा पुढील दोन ते तीन दिवसांत करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या