बीड :  चारित्र्यहीन आणि पैशांच्या जोरावर निवडून येणा-यांना आता पाडणार असा  एल्गार भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde)  केल आहे.  पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे होता असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय. जिंकून येण्याासठी तुम्ही निष्ठा गहाण टाकू शकत नाही असा घरचा आहेर त्यांनी नाव न घेता पक्षाला दिलाय.  2024 पर्यंत तुम्हाला न्याय देण्यासाठी मी मैदनात उतरणार असे  म्हणत  पंकजा  मुंडेंनी निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहे. सावरगाव इथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा (Pankaja Munde Dasara Melava)  पार पडला. त्यात हजारोंच्या जनसमुदायासमोर त्यांनी हा इशारा दिला. 


राज्यात सध्या फोडाफाडीचे राजकारण आणि अनपेक्षित घडामोडीमुळे वातावरण ढवळून निघाले आहेत.पाच वर्षे मी पक्षासाठी मरमर निष्ठेने काम केले.  मध्यप्रदेश, परळीत काम केले.  भगवान बाबांना सुद्धा दुसरा गड बनवावा लागला, भगवान श्री कृष्णाला मथुरा सोडावी लागली, असे म्हणत पंकजा मुंडे म्हणाल्या.  


Pankaja Munde Dasara Melava 2023 Update : दुसऱ्या पक्षात जाण्या इतकी पंकजा मुंडेची निष्ठा लेचीपेची नाही


पंकजा मुंडे म्हणाल्या,  निवडणुकीत माझा पराभव झाला. माझा पाय मोडला तर मला कुबड्या घेऊ चालावे लागेल. माझ्यामुळे या स्टेजवर बसलेल्यांना त्रास कमी होतो पण माझ्या जनतेला जास्त त्रास होतो. दर वेळी तुमचा नेहमी अपेक्षा भंग होतो. त्यासाठी मी तुमची माफी मागते.  कुणी म्हणते ताई या पक्षात चालल्या आहेत. दुसऱ्या पक्षात जाण्या इतकी पंकजा मुंडेची निष्ठा लेचीपेची नाही.  आता आपल्याला त्रास देणाऱ्यांचे घर  आपण उन्हात बांधू. आता माझ्या माणसांना मी त्रास होणार नाही. 


Pankaja Munde Dasara Melava 2023 Update: माझा आवाज कुणी दाबू शकणार नाही


पंकजा मुंडेच्या भाषणादरम्यान कोणतरी वायर कापल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केला आहे. वायर कापल्यानंतर  माझा आवाज कुणी दाबू शकणार नाही, असे म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता भाजपवर टीका केली. माझा आवाज संपूर्ण देशात पोहचला पाहिजे.  मी लोकांना फक्त स्वाभिमान देऊ शकते असे पंकजा मुंडे म्हणाल्या.


Pankaja Munde Dasara Melava 2023 Update: ऊसतोड कामगारांना न्याय देणार


ऊसतोड कामगारांना न्याय देणार आहे. त्यांच्या कष्टाचे चीज झाल्या शिवाय मी शांत बसणार नाही. माझ्या कारखान्यावर रेड पडली   त्या वेळी दोन दिवसात तुम्ही अकरा कोटी तुम्ही जमा केले. . तुम्ही जमा केलेले पैसे मी घेणार नाही. तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही. मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 


हे ही वाचा :


जिंकण्यासाठी निष्ठा, नितीमत्ता गहाण ठेवू शकत नाही, पंकजा मुंडे कडाडल्या; दसरा मेळाव्याच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे